हे पुस्तक म्हणजे एक अकल्पित वास्तव. संघर्ष आणि आयुष्य यांचा सुरेख संगम या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने आपल्यासमोर मांडण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक वाचत असताना किती वेळा अंगावर शहारे आल्याचे मला जाणवले. लहान मुलांना गुलामगिरी, अत्याचार आणि अतिव दुःखातून बाहेर काढण्याकरिता झटलेल्या एका महान अवलिया 'कैलाश सत्यार्थी' यांची संघर्षमय गाथा आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळते. लेखकाने कैलाश सत्यार्थी यांच्या जन्मापासून ते नोबेल शांतता पुरस्कार मिळेपर्यंतचा कठीण प्रवास या ठिकाणी वर्णिला आहे. एखाद्या व्यक्तीला आपण महानतेचा दर्जा देतो त्यावेळी त्या व्यक्तीचे आयुष्य, संघर्ष समजून घेणे खूप गरजेचे असते. बाल गुलामगिरीच्या नरकातून लहान मुलांना सोडवणारे कैलाश सत्यार्थी यांना त्यांच्या लहानपणापासून शाळेत येऊ न शकणाऱ्या मुलांबद्दल अतिशय ओढ होती. त्यांच्या जन्मा बद्दलची एक गोष्ट आहे, त्यामध्ये त्यांचा मोठा भाऊ सुरेंद्र याचा अचानक मृत्यू झाला आणि या घटनेमुळे त्यांचे पूर्ण कुटुंब निराश झाले होते. त्यावेळी ओरछचे तहसीलदार तिवारी राम मंदिरात जाऊ...
This site contains information about review of famous marathi books, autobiography, biography, novels, short stories, drama etc.