Skip to main content

Posts

नवरा आणि बायको यांच्यातील विश्वास किती महत्त्वाचा?

                                             विश्वास नवरा बायकोच्या नात्यातील           कोणी आपल्या भविष्याबद्दल ठामपणे सांगू शकत नाही. कधी काही घडेल, हे आजपर्यंत कुणाला सांगता आलेलं नाही आणि सांगता येणारही नाही. जीवनाबद्दल भरभरून बोलायचं आणि विचार करायचा, त्याचे कारण लग्न बंधनात जेव्हा एक मुलगा आणि एक मुलगी अडकते तेव्हा, ते दोघेही आपल्या येणाऱ्या आयुष्याबद्दल बरीच स्वप्ने रंगवीत असतात पण त्यातील किती पूर्ण होतात हा विषय बाजूलाच राहतो. या लेखाच्या माध्यमातून लग्नानंतर असणारे नवरा बायकोचे नाते आणि त्यांच्यातील विश्वास याचा  उलगडा करणार आहोत.           पूर्वीच्या काळापासून लग्नाची परंपरा आजही भारतात चालू आहे. आपल्या संस्कृतीत लग्नाला पवित्र आणि शुभ मानले जाते. सुरुवातीला जी लग्न व्हायची त्यामध्ये आई-वडिलांच्या  शब्दाला किंमत देऊन  मुलगा आणि मुलगी पसंत केली जायची. बदलत्या काळानुसार लग्न पद्धतीत बदल होत गेला. पूर्...
Recent posts

शेतकरी असल्यानंतर आयुष्य खरंच खडतर असते का? समजायचं असेल तर राजन गवस लिखित कादंबरी "ब,बळीचा " नक्की वाचायला हवी.Short Summary

                                         पुस्तकाचा सारांश                                    "राजन गवस " लिखित कादंबरी 'ब,बळीचा ' पुस्तकाचे मुखपष्ठ             कोणत्याही पुस्तकाच्या नावावरून बऱ्याच गोष्टी समजत असतात. हे पुस्तक वाचण्यासाठी घेतल्यानंतर,शेतकऱ्याशी संलग्न कादंबरी असणार आहे हा विचार मनामध्ये होता. आजपर्यंत अनेक पुस्तकांचे वाचन करताना ठराविक कल्पना करता येते, तसे या ठिकाणी करता येत नव्हती. या पुस्तकात कथा, पटकथा आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांचे वास्तव वाचकांसमोर मांडण्याचा सुंदर आणि वेगळा प्रयत्न लेखकाने केला आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जी काही कादंबरी वाचतो, त्यावेळी दिपूशेठ, कोणकेरी आणि आडव्याप्पा या तिघांची वेगवेगळी कथा, शेतकऱ्यांचे,सामान्य माणसांचे त्यांच्या आयुष्यातील वास्तव क्षणाक्षणाला हे पुस्तक वाचताना जाणवते. कित्येकदा आपोआपच...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील काही निवडक घटना त्यांच्या शब्दात "माझी आत्मकथा " या पुस्तकामध्ये... पुस्तकाचा थोडक्यात सारांश

                   डॉ. बाबसाहेब आंबेडकर लिखित पुस्तक, " माझी आत्मकथा" याचे मुखपृष्ठ       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे "माझी आत्मकथा " हे पुस्तक खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला, दीन-दलितांचे कैवारी बनत असतानाचा प्रवास त्यांनी त्यांच्या शब्दांत सांगितला आहे. त्यांचे शब्दच वाचकांना प्रेरणा देऊन जातात. कोणतीही व्यक्ती यशाच्या शिखरावर जात असताना,तिथे पोहोचताना, त्यांना किती गोष्टींचा त्याग करावा लागतो, कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याची आपल्याला कल्पना करता येत नाही. आत्मकथेच्या रूपातील हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणापासून ते रमाबाईंच्या त्यांच्या आयुष्यातून निघून जाण्याच्या प्रसंगापर्यंत, दलितांचा उद्धारक होण्याचा त्यांचा प्रवास, त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या आणि निवडक मनाला भिडणाऱ्या घटना या पुस्तकात पाहायला मिळतात. आणि हे पुस्तक वाचत असताना त्यांचा विषयी असणारा अभिमान द्वीगुणीत होतो याबद्दल कोणतीही शंका नाही.      सुरुवातीला त्यांच्या आजोबांचे लहान बंधू ...

"उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंची दाहकता परिस्थितीनुसार जाणवते का? "

                     समाजात वावरताना श्रीमंत गरीब आणि मध्यमवर्गीय लोक आढळतात. तिन्ही वर्गातील व्यक्तींच्या आयुष्यात खूप फरक असतो आणि प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. एखादी कोणतीही गोष्ट समोर ठेवली आणि प्रत्येक व्यक्ती त्याकडे कशा पद्धतीने बघते हे जर पाहिले तर, खूप मोठ्या प्रमाणावर फरक दिसून येतो. आता हा फरक बघायचं असेल तर बदलणाऱ्या ऋतूंमध्ये,प्रत्येकाच्या आयुष्यात कशाप्रकारे बदल होतो, हे आपण आजच्या लेखामध्ये बघणार आहोत.      सुरुवातीला तर बघूया, उन्हाळा. गरीब लोक आणि श्रीमंत लोक यांच्यासाठी उन्हाळ्यातील अनुभव वेगवेगळे असतात. ज्यावेळी उन्हाळा येतो, तो कडक ऊन घेऊन येतो. वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढते आणि त्या ऋतू नुसार राहणीमानात बदल जाणवू लागतो. पण प्रत्येकाच्या आयुष्यात नक्की बदल दिसतो का? किंवा तो कसा असतो? गरीबी असणाऱ्या लोकांसाठी उन्हाळा म्हणजे सूर्यप्रकाशाला आपला सोबती बनवल्या सारखे असते. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे, काम केल्याशिवाय, रात्रीची चूल पेटणार नाही याची त्यांना जाणीव असते. उन्हाळा आला आणि तापमान ...

तुम्ही कोणत्या स्वभावाचे आहात माहिती आहे का तुम्हाला? वाचा आणि समजून घ्या तुमचा स्वभाव नक्की कसा आहे.

                        तुमचा स्वभाव नक्की काय आहे हे नक्की जाणून घ्या                                                  व्यक्ती तितके स्वभाव           माणसाला आयुष्य एकदाच मिळते आणि ते आयुष्य जगत असताना ज्याप्रमाणे त्याला अनुभव येतात, त्याचप्रमाणे त्याला त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या तऱ्हेच्या व्यक्ती देखील भेटत असतात. भेटणारी प्रत्येक व्यक्ती सारखीच असते असे नाही, तर दोन सख्ख्या भावांच्या स्वभावात जमीन आस्मानाचा फरक दिसतो मग इतरांचे काय? आणि मग दैनंदिन जीवनात कामाच्या ठिकाणी भेटणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या स्वभावाच्या असतात. पहिल्यांदा पाहिल्यावर लगेच एखाद्याचा स्वभाव ओळखता येत नाही पण वारंवार निरीक्षण केल्यावरही जर समोरच्या व्यक्तीच्या स्वभावातील बरेच गुण तसेच राहत असतील तर मात्र एखाद्याचा स्वभाव आपण ओळखू शकतो. माणसाची दिनचर्या बदलेल, आहार, राहणीमान बदलेल पण त्याचा स्वभाव कधीही बदलू...

"६५ वर्षांच्या आजी कराडात रिक्षा कशा काय चालवतात? नांदगावच्या मंगल आजी "

                                 ६५ वर्षांच्या आजी कराडात रिक्षा कशा काय चालवतात?                                      ' मंगल आबा आवळे ' आजी                  आपण आजूबाजूला कितीतरी व्यक्ती बघत असतो, त्यांचे अनुभव ऐकत असतो, आणि प्रत्येक वेळेस यातून अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आपल्या आसपासची प्रत्येक गोष्ट पुस्तकातून न मिळणारे ज्ञान देऊन जाते. पुस्तकाचं वाचन अनेकजण करतात पण त्याचप्रमाणे आसपासच्या माणसांनाही आपण कधीतरी वाचतो का? मला जेव्हा काही वेळ मिळतो त्यावेळी मी अनेक प्रेरणादायी व्यक्तींचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करते. यातूनच एके दिवशी 65 वर्षांच्या रिक्षा चालवणाऱ्या आजींशी मला गप्पा मारता आल्या आणि त्यातून मला जी प्रेरणा मिळाली त्याविषयीचा हा लेख आहे.        मला सगळ्यात जास्त पुस्तक वाचायला आवडते आणि त्यातूनही अधून मधून मोबाईल पण चेक ...

'लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ' लिखित एक सुप्रसिद्ध कादंबरी "फकीरा " सारांश Short summary

                                                फकिरा कादंबरी सारांश                                   "अण्णा भाऊ साठे " लिखित कादंबरी ' फकिरा ' मुखपृष्ठ              'लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ' लिखित कादंबरी 'फकीरा ' ज्या कादंबरीने अनेक वाचकांना वाचनाची आवड निर्माण केली, तीच ही कादंबरी आणि तेच हे सुप्रसिद्ध साहित्यिक अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण म्हणजे वास्तव दर्शन आणि त्यांच्या आयुष्यात ज्या व्यक्ती आल्या त्याविषयीचे वर्णन. फकीरा ही व्यक्तिरेखा देखील त्यांच्या आप्तांपैकी आहे,हे आपण ही कादंबरी वाचत असताना लक्षात घ्यायला हवे. अण्णाभाऊ साठे एका ठिकाणी असे म्हणतात की, 'मी ज्यांच्या विषयी लिहितो ती माझी माणसं असतात.' त्यामुळे फकीरा ही कादंबरी असली तरीही यातील काल्पनिकता आणि वास्तविक घटना यामध्ये खूप जवळचा संबंध पहावयास मिळतो. फकीरा ...