Skip to main content

तुम्ही कोणत्या स्वभावाचे आहात माहिती आहे का तुम्हाला? वाचा आणि समजून घ्या तुमचा स्वभाव नक्की कसा आहे.

                        तुमचा स्वभाव नक्की काय आहे हे नक्की जाणून घ्या

                                                 व्यक्ती तितके स्वभाव

          माणसाला आयुष्य एकदाच मिळते आणि ते आयुष्य जगत असताना ज्याप्रमाणे त्याला अनुभव येतात, त्याचप्रमाणे त्याला त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या तऱ्हेच्या व्यक्ती देखील भेटत असतात. भेटणारी प्रत्येक व्यक्ती सारखीच असते असे नाही, तर दोन सख्ख्या भावांच्या स्वभावात जमीन आस्मानाचा फरक दिसतो मग इतरांचे काय? आणि मग दैनंदिन जीवनात कामाच्या ठिकाणी भेटणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या स्वभावाच्या असतात. पहिल्यांदा पाहिल्यावर लगेच एखाद्याचा स्वभाव ओळखता येत नाही पण वारंवार निरीक्षण केल्यावरही जर समोरच्या व्यक्तीच्या स्वभावातील बरेच गुण तसेच राहत असतील तर मात्र एखाद्याचा स्वभाव आपण ओळखू शकतो. माणसाची दिनचर्या बदलेल, आहार, राहणीमान बदलेल पण त्याचा स्वभाव कधीही बदलू शकत नाही असे बोलणे आपल्या बऱ्याचदा कानावर पडताना दिसते. या म्हणण्यालाही काहीतरी अपवाद असतील तर तेही स्वीकारायला पाहिजे. लहानपणापासून होणारे संस्कार आजूबाजूला असणारे वातावरण, ज्या माणसांच्यात आपण सतत असतो त्यांचा स्वभाव आणि  आयुष्यात आलेले असंख्य अनुभव या सगळ्या गोष्टीतून माणसाचा एक विशिष्ट स्वभाव तयार होत असतो. समाजात वावरताना कोणकोणत्या स्वभावाची माणसे आपल्याला भेटू शकतात आणि आपलाही स्वभाव नक्की कसा आहे, याच्या विषयीची माहिती या लेखात आपण बघणार आहोत. 

       १) शांत स्वभावाची स्वभावाच्या व्यक्ती: 

            सुरुवातीला तर बघुयात आणि जाणून घेऊयात शांत स्वभावाची माणसं. आता एखाद्याचा शांत स्वभाव आहे, असे लेबल कधी द्यायचं तर अशा स्वभावाच्या व्यक्ती खूपच कमी बोलक्या असतात. कोणत्याही विषयावर चर्चा चालू असली, तरीही लगेच काहीतरी बोलने या व्यक्ती आवर्जून टाळतात. प्रत्येक गोष्टीवर घटनेवर कोणत्याही प्रकारची गडबड न करता, अतिशय शांत डोक्याने या व्यक्ती विचार करताना दिसतात,आताताई पणे हे कोणताही निर्णय  कधीही घेत नाहीत. त्यामुळे खोलात जाऊन विचार करण्याच्या यांच्या स्वभावामुळे यांचा निर्णय सहसा चुकत नाही. प्रत्येकाला मन आहे, भावना आहेत पण या व्यक्ती चुकूनही आपल्या मनातील भावना  दुसऱ्यापाशी व्यक्त करत नाहीत. स्वतःच्या आयुष्यातील दुःख दुसऱ्यांना सांगण्याची गरज त्यांना वाटत नाही. असं असतानाही त्यांच्यापाशी कोणीही विश्वासाने आपल्या मनातील दुःख व्यक्त करू शकते. कारण इकडच्या गोष्टी तिकडे करण्याकडे या व्यक्तींचा अजिबात ओढा नसतो. स्वभाव शांत असल्यामुळे अशा व्यक्ती खूप संयमी असतात. कोणत्याही गोष्टीचा तडकाफडकी निर्णय न घेता, शांत डोक्याने विचार करतात आणि त्यानंतरच पुढे काय करता येऊ शकतं याबद्दल ठरवतात. 

२) बोलक्या बोलक्या आणि उत्साही स्वभावाच्या व्यक्ती: 

              या स्वभावाच्या व्यक्ती प्रत्येकाला खूप आवडतात. त्यांची एक वेगळी छाप समोरच्यावर पडते. आपण आजूबाजूला बघतो की, स्त्री असो किंवा पुरुष, दोघांमध्येही काही व्यक्ती असतात, ज्या खूप बोलक्या असतात. त्या सतत कुणाशी ना कुणाशी संवाद साधताना पाहायला मिळतात. त्यांच्याजवळ जे काही ज्ञान त्यांना असेल ते देण्याबरोबरच समोरच्या व्यक्तीशी खूप चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परिस्थिती आणि वातावरण बदलले तरी देखील पटकन सगळ्यांशी यांना जुळवून घेता येतं. सतत उत्साही असल्यामुळे त्यांचा कुणालाही कधीही कंटाळा येत नाही. या व्यक्ती नेहमी सर्वांना प्रेरणा देत राहतात. 

३) रागीट स्वभावाच्या व्यक्ती: 

           या व्यक्तींचा स्वभाव रागीट असल्याने खूप कमी लोक यांच्या संपर्कात येतात. कोणत्याही गोष्टीवर लगेच बोलून जाणाऱ्या या व्यक्ती असतात. आणि या स्वभावामुळे समोरच्या व्यक्तीला नको त्या गोष्टी, कधी कधी बोलून जातात. यांच्या या स्वभावामुळे बरेच जण दुखावले जातात. गोष्ट छोटी असली तरी यांना राग लगेच येतो, रागाच्या भरात आपण काय करतो याचे भान त्यांना सहसा राहत नाही. आणि त्यांच्या या स्वभावाचा फटका त्यांना आयुष्यभर बसत राहतो. रागीट स्वभाव असल्यामुळे कोणी यांच्या जवळ  येत नाही. या व्यक्तींच्या मनात काही नसले तरीही राग आणि रागाच्या भरात उच्चारलेले वाईट शब्द तात्पुरते असतात पण यामुळे समोरच्या लोकांशी विनाकारण वैरत्त्व निर्माण होते. या लोकांना त्यांचा अतिसंवेदनशील स्वभाव नडतो.आणि लगेच एखादी गोष्ट बोलून ते मोकळे होतात. पुढे होणाऱ्या नुकसानीचा ते अजिबात विचार करत नाहीत. त्याचप्रमाणे पूर्वीच्याच एखाद्या गोष्टीचा राग मनात धरून ठेवल्याने, परिस्थिती कुठली जरी असली तरी राग येणे, चिडचिड होणे या गोष्टी यांच्या स्वभावात दिसून येतात. पण या लोकांचाही स्वभाव बदलू शकतो,जर त्या व्यक्तीलाच आपला स्वभाव बदलायचा असेल तर. 

४) स्वार्थी स्वभावाच्या व्यक्ती: 

          या स्वभावाच्या व्यक्ती सुरुवातीला खूपच छान वाटतात, पण कालांतराने  येणाऱ्या अनुभवानुसार त्यांचा खरा स्वभाव उघडकीस येतो. या व्यक्ती प्रत्येक गोष्ट करतात,त्यामध्ये स्वतःचा फायदा होतो आहे का हे बघूनच. पुढे त्यांचे एखादं काम असेल तर खूपच गोड बोलतात व एकदा का काम झालं की मदत करणाऱ्याच्या तोंडाकडे बघत नाहीत. एखाद्याने केलेला उपकाराची यांना अजिबात जाणीव असत नाही. आणि सहसा या स्वभावाची व्यक्ती कुणालाही फायद्याशिवय कसल्याही प्रकारची मदत करत नाहीत. एखाद्या कुटुंबात अशी व्यक्ती असेल तर आपला फायदा कसा करून घेता येईल याचाच विचार त्यांच्या मनात चाललेला असतो. एकदा का त्यांचे काम झाले म्हणजे समोरच्या व्यक्तीची गरज संपली तर ते मदत करणाऱ्या व्यक्तीला काडीची सुद्धा किंमत देत नाहीत. दुसऱ्याच्या दुःखाशी,संकटांशी, अडचणींशी यांना काहीही घेण देणं नसतं. आपले काम, आपला फायदा, कमी मेहनतीत जास्त मोबदला मिळवण्यासाठी या व्यक्तींची धडपड चाललेली असते. पण यांच्या सानिध्यात असणाऱ्या लोकांना यांच्या स्वार्थी स्वभावाचा अंदाज आला की पुन्हा कोणी यांना जवळ करत नाही आणि विश्वासही ठेवत नाहीत. 

५) मनमोकळा आणि प्रेमळ स्वभावाच्या व्यक्ती: 

        समाजासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या व्यक्ती असतात. यांचा स्वभाव अतिशय मनमोकळा आणि प्रेमळ असतो. एखाद्याने यश मिळवले, चांगले काम केले तर मोकळ्या मनाने समोरच्याचे कौतुक करणे यांच्या स्वभावात असते. त्याचप्रमाणे एखादा वाईट मार्गाला निघाला असेल तरी त्याला खूप प्रयत्न करून चांगल्या मार्गावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दुसऱ्याच्या बाबतीत काहीही वाईट घडलं तर यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. समाजातील प्रत्येक व्यक्तीच चांगला व्हाव ही भावना बाळगून, स्वतः पेक्षाही दुसऱ्याचा विचार करताना या व्यक्ती नेहमीच दिसतात. एखाद्याला संकटातून अडचणीतून सोडण्यासाठी नेहमी तयार असणाऱ्या या स्वभावाच्या व्यक्ती असतात. 

६) मत्सरी स्वभावाच्या व्यक्ती: 

        अशा व्यक्ती समाजात वावरताना बघायला मिळतात आणि तेही खूप मोठ्या प्रमाणावर. या व्यक्तीचा स्वभाव खूप विचित्र असतो. दुसऱ्याच चांगला झाल्यावर, सगळ्यात जास्त दुःख कोणाला होत असेल तर या स्वभावाच्या लोकांना. स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांचे खूप लक्ष असते. दुसऱ्यांना यश मिळाले, आपल्यापेक्षा कोणीतरी पुढे निघाले की, यांना प्रमाणापेक्षा जास्त वाईट वाटते. कारण नसताना या व्यक्ती अस्वस्थ होतात, चिडचिड करायला लागतात. दुसऱ्याचा वाईट झाले की मात्र यांना आनंद होतो आणि कधी एखाद्याचं वाईट होतंय याची जणू ते वाट बघत बसलेले असतात. आपल्याला सगळे येते या मानसिकतेमुळे, दुसऱ्यांनी त्यांच्या पुढे गेलेले त्यांना अजिबात आवडत नाही. स्वतःमध्ये बदल करण्याची गरज वाटत नाही आणि दुसऱ्याने पुढे गेलेलं बघवत देखील नाही. पण यांच्या जवळपास सकारात्मक व्यक्ती असतील, समजावून सांगणाऱ्या व्यक्ती असतील तर त्यांच्या स्वभावातील बदल शक्य आहे. 

७) धीर गंभीर आणि जबाबदार व्यक्ती: 

        या व्यक्ती लोकांमध्ये फारशा मिसळत नाहीत, तसेच व्यक्तही होत नाहीत. प्रत्येक गोष्ट करत असताना खूप विचारपूर्वक निर्णय यांच्याकडून घेतले जातात. आपल्या कुटुंबाची आपल्यावर असणारी जबाबदारी याची जाणीव असल्याने, कोणत्याही चुकीच्या मार्गावर या व्यक्ती जाताना दिसत नाहीत. लोकांना मदत लागल्यास, मदत करण्यास लगेच व्यक्ती पुढे सरसावतात. दुसऱ्याने तरी सल्ला मागितला तरी देखील योग्य तो सल्ला देतात. विनाकारण कुणालाही त्रास देत नाहीत. जबाबदारीचे ओझे असल्यामुळे फार गप्पा गोष्टीत न गुंतता आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणाऱ्या अशा या व्यक्ती असतात. 

         या पृथ्वीतलावर जन्म घेणारी प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. आणि प्रत्येकाला येणाऱ्या अनुभवातून माणूस घडत असतो आणि त्याचा स्वभावही बनत असतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती आपल्याला भेटतात. दुसऱ्यांच्या स्वभावाचा विचार करताना, आपला स्वतःचा स्वभाव कसा आहे हे कधीच जाणून घेत नाही. वर लिहिल्याप्रमाणे आपणही आपला स्वभाव कसा आहे ते जाणून घेण्यास काही हरकत नाही. आणि जर आपल्याला वाटले की मलाही स्वभाव बदलायला हवे हवा आहे तर थोडा विचार करून नक्की आपण आपला स्वभावामध्ये बदल करू शकतो. स्वभाव हा आयुष्यभर पर्यंत तसाच राहत नाही तर आपल्याला स्वतःलाच बदलायचं नसतं, त्यामुळे आपल्याला तसं वाटतं. आणि त्यातूनही आपल्या जवळच्या व्यक्तींचा स्वभावाची कारणे समजून घेतली तर मात्र आयुष्यातील  बऱ्याच समस्या आपोआप सुटतील आणि नात्यातला गोडवा कायम राहील हे देखील निश्चित आहे.

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...