Skip to main content

Posts

Showing posts from August, 2023

विजय तेंडुलकर लिखित एक सुप्रसिद्ध नाटक 'घाशीराम कोतवाल'

 विजय तेंडुलकर यांचे लिखाण म्हणजे वाचकांसाठी पर्वणीच. या नाटकातील मुख्य आशय समजणे अवघड आहे.हे नाटक पाहण्यात जेवढा आनंद होते तसाच ते नाटक वाचत असताना होतो. विजय तेंडुलकर हे प्रसिध्द लेखक,पटकथाकार, दिग्दर्शक आणि राजकीय विशलेषक  म्हणून सर्वांना परिचित होते.  हे नाटक दोन अंकामध्ये विभागलेले आहे.या नाटकाची सुरुवात होते ती गणेश स्तवनाने.घाशीराम कोतवाल,नाना फडणवीस, गुलाबी,ललीतागौरी, ब्राह्मण, सूत्रधार ही या नाटकातील मुख्य पात्रे आहेत.यामध्ये घाशीराम सावळदास हा कणोजमधील एक गरीब ब्राह्मण आपले नशीब आमावण्यासाठी पुण्यामध्ये आलेला असतो.सुरुवातीला कोणी ओळखीचे नसल्याने तो तमाशातील गुलाबी नामक नर्तकी कडे आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि सोंगाड्याचे काम करत असतो.त्याठिकाणी सुरवातीला पुण्यातील भ्रष्ट कारभार आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये प्रामुख्याने नाना फडणवीस आणि पुण्यातील प्रत्येक ब्राह्मण बावणखानी याठिकाणी जेथे वेश्या व्यवसाय सुरू असतो तेथे जाताना पाहायला मिळतात.तेथील स्त्रियाही वाईट वर्तणूक करताना दिसतात. एक दिवस नाना फडणवीस गुलाबी हीचा नाच पाहण्यासाठी आलेले असतात.नाच पाहता पाहता तेह...