Skip to main content

विजय तेंडुलकर लिखित एक सुप्रसिद्ध नाटक 'घाशीराम कोतवाल'

 विजय तेंडुलकर यांचे लिखाण म्हणजे वाचकांसाठी पर्वणीच. या नाटकातील मुख्य आशय समजणे अवघड आहे.हे नाटक पाहण्यात जेवढा आनंद होते तसाच ते नाटक वाचत असताना होतो. विजय तेंडुलकर हे प्रसिध्द लेखक,पटकथाकार, दिग्दर्शक आणि राजकीय विशलेषक  म्हणून सर्वांना परिचित होते. 

हे नाटक दोन अंकामध्ये विभागलेले आहे.या नाटकाची सुरुवात होते ती गणेश स्तवनाने.घाशीराम कोतवाल,नाना फडणवीस, गुलाबी,ललीतागौरी, ब्राह्मण, सूत्रधार ही या नाटकातील मुख्य पात्रे आहेत.यामध्ये घाशीराम सावळदास हा कणोजमधील एक गरीब ब्राह्मण आपले नशीब आमावण्यासाठी पुण्यामध्ये आलेला असतो.सुरुवातीला कोणी ओळखीचे नसल्याने तो तमाशातील गुलाबी नामक नर्तकी कडे आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि सोंगाड्याचे काम करत असतो.त्याठिकाणी सुरवातीला पुण्यातील भ्रष्ट कारभार आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये प्रामुख्याने नाना फडणवीस आणि पुण्यातील प्रत्येक ब्राह्मण बावणखानी याठिकाणी जेथे वेश्या व्यवसाय सुरू असतो तेथे जाताना पाहायला मिळतात.तेथील स्त्रियाही वाईट वर्तणूक करताना दिसतात.

एक दिवस नाना फडणवीस गुलाबी हीचा नाच पाहण्यासाठी आलेले असतात.नाच पाहता पाहता तेही तिच्यासोबत नाचायला लागतात आणि त्यांचा पाय मूर्गळतो.तेथे असणाऱ्या घाशीराम च्या पाठीवर पाय ठेवून ते आराम करतात.त्याच्या बोलण्यावर खुश होऊन ते त्याला मौल्यवान किमतीचा एक हार देतात.ते गेल्यानंतर गुलाबी तो हार हिसकावून घेत त्याला हकलवून लावते.पुढे पर्वतीच्या रमण्यात ब्राह्मणांना जेवण देण्यात येत असते त्याठिकाणी तो जातो पण तिथे त्यालाच चोर ठरविण्यात येते.तसेच मारहाण करून त्याला हद्दपारीची शिक्षा सुनावली जाते.या दोन प्रसंगानंतर त्याची व्यक्तीरेखा पूर्णपणे बदलते आणि सूडाची भावना त्याच्या मनात घर करते.तो म्हणे "अब मै हु शैतान! अंदरसे शैतान औ र बहरसे सुव्वर.जो मुझे बनाया तुम लोगोने."पुढे नाना फडणवीसांनच्या स्त्री लंपटपणाचा फायदा घेण्याचे घाशीराम ठरवितो. आपल्याच मुलीला ललीतागौरीला तो त्यांच्या हवाली करतो.तिला भेटण्यासाठी नाना तळमळतात.माझ्या मुलीच्या बदल्यात पुण्यातील श्रीमंत लोकांची थोबडे बंद करण्यासाठी पुण्याचा कोतवाल करण्याची मागणी करतो.घाशीराम सावळदास हा पुण्याचा कोतवाल बनतो. ब्राह्मनांच्या गर्दीत नाना दिसेनासे झाल्यावर घाशीराम कोतवाल प्रवेश करतो आणि इथेच पहीला अंक संपतो.

दुसऱ्या अंकाच्या सुरुवातीला पुण्यनगरीत घाशीराम कोतवाल झालेला आहे.त्याचा परवानगीशिवाय कोणतेही काम केले तर परवाने मागितले जात आहेत,खटले भरले जात आहेत, तुरुंगच्या तुरुंग भरले जात आहेत. संपुर्ण पुण्यनगरी घाशीराम याच्या नियमांनी हवालदिल झालेली आपल्याला पाहायला मिळते.प्रत्येक गोष्टीची सक्ती झालेली आहे.त्यातच एका गरीब ब्राह्मण ज्याने चोरी केलेली नसते त्यालाही कठोर शिक्षा सुनावली जाते.पुढे नाना फडणीसांच्या लग्नाचे वर्णन दिले आहे.आपल्याकडे आता पैसे आहेत ,सत्ता आहे आणि मुलीचे लग्न झाले पाहिजे हा विचार त्याच्या मनात येतो.त्यासाठी तो नाना फडणवीसांना मुलीबद्दल विचारतो.त्यावेळी चंद्रा सुईन ,नानांच्यामुळ  पोटात  वाढणाऱ्या मुलाला जन्म देत असताना तिचा मृत्यू झाल्याचे सांगते.हे समजल्यावर त्याला खूप दुःख होते.तो विचार करू लागतो की आपल्या सत्तेच्या हव्यासमुळे आपण मुलीचे आयुष्य संपवीले.या प्रसंगानंतर तो नियम जास्तच कडक करतो. बाहेरगावाहून आलेल्या ब्राह्मणांना तुरूंगात बंद करतो आणि संख्या जास्त असल्याने बावीस ब्राह्मनांचा तुरूंगात गुदमरून मृत्यू होतो.या घटनेने सर्व पुणे पेटून उठते आणि घाशीराम कोतवाल याच्या वधाचा हुकुम मागतात.नाना फर्मनवर सही करतात आणि म्हणतात की काट्याने काटा निघाला नाही तरी त्याचा आता काय उपयोग राहीला होता.शेवटी सर्व ब्राह्मन त्याला मारून टाकतात.

अशा प्रकारे हे नाटक ऐतिहासिक नाही तर यातील आशय समजून घेणे खूप गरजेचे आहे

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...