एक थोर साहित्यिक 'रणजित देसाई ' यांचा जन्म कोल्हापुरातील ' कोवाड ' येथे एका संपन्न कुटुंबात झाला होता. त्यांचे कोणतेही साहित्य वाचणे म्हणजे एक ज्ञानमय व सुंदर अनुभव म्हणायला हरकत नाही. त्यांनी अनेक प्रकारचे लेखन केलेले आहे. आणि त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र शासनाने त्यांना 'पद्मश्री ' हा किताब देऊन गौरवलेले आहे. त्यांच्या असंख्य साहित्य कृतीतील 'राधेय ' ही कादंबरी माझ्या वाचण्यात आली. ही कादंबरी महाभारतातील दुर्लक्षित,उपेक्षित पण सामर्थ्यपूर्ण, कर्तुत्वशाली सूर्यपुत्र ' कर्ण ' या पात्रावर आधारलेले आहे. कादंबरीच्या सुरुवातीला कुरुक्षेत्र आणि त्या ठिकाणी झालेल्या कौरव -पांडव यांच्या युद्ध समाप्तीनंतरची भेसूर शांतता आणि सर्व पांडव कुंती माता आणि कृष्ण यांचा चाललेला संवाद मन स्तब्ध करतो. त्यातूनच समजते ती कर्णाची जीवन कहाणी. राधा माता आणि अधिरथ यांच्या मायेच्या छत्राखाली कर्णाचे बालपण गेल्याचे आपल्याला समजते. लहानपणापासूनच त्याच्...
This site contains information about review of famous marathi books, autobiography, biography, novels, short stories, drama etc.