'बाबा आमटे' हे नाव ऐकले नसेल असा मनुष्य मिळणे विरळचं. कारण त्यांच्या कार्यकर्तृत्वाची महती संपूर्ण जगभर पसरलेली आहे. कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे महान कार्य हाती घेणारे आणि आणि ते पूर्णत्वास नेणारे समाज सुधारक म्हणून आपल्याला ते परिचित आहेत. कुष्ठरोग्यांची सेवा करण्याबरोबरच आनंदवनामध्ये त्यांनी केलेल्या इतर प्रयोगांची माहिती आणि श्रमाचे महती मला त्यांचे हे चरित्र वाचत असताना समजले. एखाद्या महान अवलीयाच्या चरित्रामधून आपल्याला आपल्या आयुष्यातील संकटांना भेदून पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असते, तशीच प्रेरणा हे पुस्तक वाचत असताना मिळते. महात्मा गांधी, विनोबा भावे व साने गुरुजी यांच्या प्रेरणा स्थानातून वैचारिक प्रेरणा घेऊन स्वतःमध्ये वैचारिक बदल घडवून आणणारे समाज सुधारक बाबा आमटे यांना वाचक वर्ग विसरू शकत नाही. एखादी छोटीशी घटनाही मनुष्याच्या जीवनात आमुलाग्र बदल करत असते. पण तो क्षण पकडता येणे महत्वाचे. 'मुरलीधर देविदास आमटे' म्हणजेच 'बाबा आमटे' यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील ' हिंगणघाट ' येथे २६ डिसेंबर १९१४ रोजी झाला. घरची...
This site contains information about review of famous marathi books, autobiography, biography, novels, short stories, drama etc.