Skip to main content

' बापट भ. डा.' लिखित 'बाबा आमटे ' चरित्र

          'बाबा आमटे' हे नाव ऐकले नसेल असा मनुष्य मिळणे विरळचं. कारण त्यांच्या कार्यकर्तृत्वाची महती संपूर्ण जगभर पसरलेली आहे. कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे महान कार्य हाती घेणारे आणि आणि ते पूर्णत्वास नेणारे समाज सुधारक म्हणून आपल्याला ते परिचित आहेत. कुष्ठरोग्यांची सेवा करण्याबरोबरच आनंदवनामध्ये त्यांनी केलेल्या इतर प्रयोगांची माहिती आणि श्रमाचे महती मला त्यांचे हे चरित्र वाचत असताना समजले. एखाद्या महान अवलीयाच्या चरित्रामधून आपल्याला आपल्या आयुष्यातील संकटांना भेदून पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असते, तशीच प्रेरणा हे पुस्तक वाचत असताना मिळते. महात्मा गांधी, विनोबा भावे व साने गुरुजी यांच्या प्रेरणा स्थानातून वैचारिक प्रेरणा घेऊन स्वतःमध्ये वैचारिक बदल घडवून आणणारे समाज सुधारक बाबा आमटे यांना वाचक वर्ग विसरू शकत नाही. एखादी छोटीशी घटनाही मनुष्याच्या जीवनात आमुलाग्र बदल करत असते. पण तो क्षण पकडता येणे महत्वाचे.

          'मुरलीधर देविदास आमटे' म्हणजेच 'बाबा आमटे' यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील ' हिंगणघाट ' येथे २६ डिसेंबर १९१४ रोजी झाला. घरची सुसंपन्न परिस्थिती असणाऱ्या घरात त्यांचा जन्म झाला तरीही उच्चनीचतेचे भेदभाव नसले पाहिजेत, असे विचार त्यांच्या मनात लहानपनापासूनच येत असत.आई वडील यांच्या बद्दल सांगताना,आपल्या आईला ते आदर्श मानतात आणि बंडखोरीचा स्वभाव तिच्याकडूनच त्यांना मिळाल्याचा ते उल्लेख करतात. तसेच आपल्या मनाला पटलेल्या गोष्टी निर्भीडपणे करायच्या हा गुणही बालपनापासूनच त्यांच्या ठिकाणी दिसून येतो. नागपूर येथे त्यांचे शिक्षण सुरू झाले होते आणि सुट्टीच्या दिवसात ते रानावनात भटकत आणि त्यातूनच आदिवासी लोकांबद्दल त्यांना विलक्षण आकर्षण वाटत असे. तेव्हा ते भमरागडला जाऊन आले,तिथून परत येताना 'या भूमीसाठी मी काहीतरी करीनच' असा निर्धार केला व हेमलकसा येथील 'लोक बिरादरी '  प्रकल्पातून तो त्यांनी पूर्णत्वास नेला. बाबांना डॉक्टर होण्याची इच्छा होती पण त्यांच्या वडिलांच्या इच्छेखातिर ते वकील झाले. आणि पुढे गांधी आणि विनोबा भावे यांच्या कल्पनेतील साम्यकुल साकारण्यासाठी 'श्रमाश्रमाची ' स्थापना केली. याच बरोबर बाबांनी वरोड्यात झाडूवाले, भंगी ,विणकर यांच्या हक्कांसाठी संघटना बांधायला सुरुवात केली. पुढे त्यांनी वकिली सोडली आणि म्युनिसिपालटीतील कामात ते सक्रिय झाले होते. तसेच भंगी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते आणि एकदा भंग्यानी सेवाशर्तीतील सुधारणा आणि वेतन वाढीसाठी संप पुकारला. तेव्हा बाबांशी बोलत असताना संपकरी म्हणाले की 'आम्हाला पाऊस पडत असतानाही डोक्यावरून मैला वाहून नेण्याचे काम करावे लागते.ते तुम्ही करू शकाल का?' त्यावेळी बाबांनी ते आव्हान स्वीकारलं आणि पुढे नऊ महिने ते काम करून दाखवले. एकदा असंच पडणाऱ्या पावसात संडास साफ करून मैला वाहून नेण्याचे काम करत असताना एक नाक, कान झडून गेलेला 'तुळशीराम ' नावाचा कुष्ठरोगी गटारात पडलेला त्यांना दिसला. त्याच्या अंगावरील जखमांतून आळ्या बाहेर पडत होत्या. ती घटना पाहून त्यांना खूप भीती वाटली आणि त्या कुष्ठरोग्याच्या अंगावर एक तरट टाकून ते निघून गेले. आणि त्या प्रसंगातूनच त्यांचे कार्यक्षेत्र बदलले. त्या कुष्ठरोगी  आणि त्याबद्दलचे विचार त्यांच्या मनातून जायला तयार नव्हते.

                      आणि या छोट्याशा घटनेने त्यांनी 'श्रमाश्रमाचा ' प्रयोग बंद करून टाकला आणि आता कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचा संकल्प त्यांनी घेतला. कुष्ठरोग याविषयी असणारी भीती नाहीशी करताना त्यांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी ठरविले. आणि या विचारातून 'आनंदवनाचे ' संकल्पचित्र साकार झाले. म्हणूनच गांधीजींनी त्यांना 'अभयसाधक ' म्हटले आहे.

                         कुष्ठरोग हा 'मायकोबॅक्टेरियम लेप्री ' या जिवाणूंमुळे होतो. हे जंतू शरीरात शिरल्यावर मज्जातू किंवा चेतातंतूवर हल्ला करतात. त्यातून तळहात -तळपाय यातील संवेदना नष्ट होतात. यात रोग्याला कुठेही दुखले, खुपले, भाजले तरी वेदना होत नाहीत. आणि जखमा वाढत जाऊन हाडापर्यंत पोचतात व शरीराला विकृती येते. आणि ते भयावह रूप पाहण्याचे धाडस भल्याभल्यांना होत नाही. आणि या रोगाबद्दल अनेक गैरसमज पसरलेले होते आणि आज देखील आहेत. आणि त्यामुळेच बाबा आमटे यांनी या लोकांसाठी काम करायचे ठरवले. फादर डेमियन, महात्मा गांधी ,मनोहर दिवाण,शिवाजीराव पटवर्धन यांनी सुरू केलेल्या सेवेचा विस्तार बाबा आमटे यांनी केला.

                         बाबा आमटे यांनी लग्न न करण्याचे ठरवले होते पण साधनाताईंशी लग्न करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय अगदी सुखद होता. त्यांच्या बाबांच्या आयुष्यात येण्यामुळे कठीण प्रसंगातही न कोसळण्याची त्यांना प्रेरणा मिळाली.  त्यांनी आपले आयुष्य महारोग निवारण्याच्या कार्यास वाहून घेण्याचे ठरवले. त्यातूनच  'महरोगी सेवा समिती ' स्थापना करून ही समिती विधिपूर्वक अस्तित्वात आणली. त्यावेळी शासनाकडून त्यांना पन्नास एकर जंगल मिळाले आणि बाबांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीतून 'आनंदवन ' उभे राहिले.त्यांनी या ठिकाणाला ठेवलेल्या नावातूनच त्यांच्या विचारातील वेगळेपणा आपल्याला पहावयास मिळतो. त्या लोकांची सेवा करत असतानाच त्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा धडाही ते शिकवीत. बाबा नेहमी त्या लोकांना सांगत की, 'अरे तुझ्या शरीराची माती झाली म्हणून जीवनाची माती का व्हावी. यंत्र-तंत्राच्या साह्याने त्या मातीचं सोनं बनवू. ' त्यांच्या या कार्यात त्यांचा मुलगा डॉ. विकास आमटे हेही सामील झाले. आनंदवनातील हॉस्पिटलची जबाबदारी त्यांनी घेतली.'आनंदवनात ' त्यांनी जमीन तयार केली. त्यामध्ये पिकणारा भाजीपाला बाजारपेठेत विक्रीस पाठवला जाई. सुरुवातीला कुष्ठरोग्यांनी पिकवलेला भाजीपाला म्हणून विकत घ्यायला कोणी तयार होत नसे पण पुढे हा गैरसमज दूर होत गेला.

                                    ' आनंदवनात ' वनौषधी शेती, फुलशेती शेती, शेतीला पूरक व्यवसाय असे अनेक प्रयोग करण्यात आले.ते खूप कौतुकास्पद आहेत.आंतरराष्ट्रीय मैत्री जोपासणारी 'सर्विस सिविल इंटरनॅशनल '  संघटनेने भारत भेटीला आले असता आनंदवनातील रुग्णांसाठी दोन पक्क्या इमारती बांधल्या. १९६१ मध्ये 'टिन कॅन प्रोजेक्ट' सुरू झाला. यातूनच अंध, कुष्ठमुक्त, अपंग' मूकबधिर  अपघातग्रस्त यांच्यासाठी 'संधीनिकेतन' सुरू झाले. त्यातूनच पुढे 'आनंदनिकेतन' महाविद्यालय सुरू करण्यात आले.' मुक्तीसदन', 'सुखसदन', 'स्नेहसावली' अशी निवासस्थानी कुष्ठरोग यांसाठी बांधण्यात आली. बाबा आमटे यांच्या म्हणण्यानुसार,' वेदांनाही सांगता येत नाही ते वेदनेला सांगता येते.'

                          ' गोकुळ 'स्थापनेची कथाही करुणामय आहे. वरोडा रेल्वे स्टेशनवर टाकून दिलेली मुलगी घेऊन कुणीतरी बाबांकडे आले आणि त्यावेळी टाकून दिलेल्या मुला - मुलींची संस्थाही काढण्याची कल्पना त्यांना सुचली.  कुष्ठ मंगळविवाहाचे सुंदर क्षणही  आनंदवानात साजरे होतात. असे अनेक प्रयोग करत असताना बाबांच्या मनात हेमलकसा ' लोक  बिरादरी ' प्रकल्प आला. माडिया आदिवासींचा प्रदेश आणि या ठिकाणी डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी काम करण्याचे ठरवले. त्यानंतर बाबांचे 'भारत जोडो अभियान' लक्षात राहण्यासारखे होते. मनस्वी कार्य करणारे समाज सुधारक आणि त्यांचे काम पुढे नेणारी त्यांची मुले. खरंच जो विचार आपल्या मनाला स्पर्शून जात नाही, त्याला खरे तर बाबा आमटे ने न्याय दिला त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला.

                          'डेमियम  डटन अवॉर्ड', 'टेम्पलटन प्राईज', 'नोबेल प्राईज', 'मॅगसेस अवार्ड ',भारत सरकारकडून 'पद्मश्री', 'पद्मविभूषण' हे पुरस्कारही त्यांना मिळाले. पारितोषिकांच्या रुपाने मिळालेले सर्वच्या सर्व पैसे बाबांनी महारोगी सेवा समितीकडे सुपूर्द केले. 'माझ्या रुग्णांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य हा मी जगातील सर्वात मोठा पुरस्कार समजतो' असे म्हणणारे बाबा आमटे युवा पिढीचे प्रेरणास्थान आहेत.

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...