महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री,त्यानंतर देशाचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवणारे यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र 'कृष्णाकाठ ' म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यातील १९१२ ते १९४६ पर्यंतच्या कालखंडाचा अतिशय सर्वोत्तम असा घेतलेला आढावा आहे, असे म्हणता येईल. हे पुस्तक वाचणे म्हणजे एक प्रकारचे सर्वोत्तम अनुभव ग्रहण करणे आहे. सुरुवातीपासूनच हे पुस्तक उत्कृष्ट तर आहे,परंतु ते तीन कालखंडामध्ये विभागलेले आहे.पहिल्या भागामध्ये 'यशवंतराव चव्हाण ' यांची जी जडणघडण झालेली होती, त्याबद्दलचे विचार मांडलेले आहेत. दुसऱ्या भागामध्ये वैचारिक आंदोलन आणि तिसऱ्या भागामध्ये राजकारणामध्ये त्यांचा झालेला प्रवेश यांचे वर्णन केलेले आहे. कोणतीही व्यक्ती सहजासहजी मोठी होत नाही तर त्यापाठीमागे अपार कष्ट, अनुभव त्याचप्रमाणे संगत महत्त्वाची असते, या गोष्टीची जाणीव हे पुस्तक वाचताना होते. या पुस्तकाची सुरुवात होते ती, प्रसिद्ध कवी श्री गोविंदाग्रजांची प...
This site contains information about review of famous marathi books, autobiography, biography, novels, short stories, drama etc.