प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनेक बऱ्या- वाईट घटना घडत असतात आणि त्यातूनच त्या व्यक्तीची जडर-घडण होऊन एक आदर्श मूर्ती बनत असते. या ओळींप्रमाणेच एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन असामान्य कर्तृत्व निर्माण करणारे डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र ' आमचा बाप आणि आम्ही' अतिशय प्रेरणादायी आहे. हे पुस्तक वाचताना कित्येक वेळा डोळ्यांच्या कडा पाणवतात. तर कित्येकदा आपण ठरवले तर, आपण काहीही करू शकतो असा आत्मविश्वास वाचकांच्या मनामध्ये निर्माण करतात. हे फक्त आत्मचरित्र नसून त्यांनी स्वतःबरोबर, त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्याचा अत्यंत सुंदरपणे घेतलेला आढावा किंवा एक सुंदर आरसा आहे असे म्हणायला हरकत नाही. या पुस्तकाची सुरुवात होते ती, लेखकाने आपल्या आजीविषयी दिलेल्या माहितीमधून. नरेंद्र जाधव यांची आजी राहीबाई जिला सर्वजण राहीआई असे म्हणत असत. स्वतःच्या आईला ते बाई म्हणत ;परंतु आजीला मात्र आई म्हणत असत. ही त्यांची आजी लेखकाचा जन्म होण्याच्या अगोदर पासूनच डोळ्यांनी पूर्णपणे अंध झालेल...
This site contains information about review of famous marathi books, autobiography, biography, novels, short stories, drama etc.