' समिधा' हे ' साधनाताई आमटे ' यांचे आत्मचरित्र माझ्या वाचनात आले. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे,एका स्त्रीचा हात असतो, हे वाक्य आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो पण याची प्रत्यक्ष प्रचिती हे आत्मचरित्र वाचताना आली. स्त्रीच्या आयुष्याची जिवंत गुंफण लेखिका या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर ठेवतात. बाबा आमटे आणि त्यांचे कार्य आपल्याला सर्वदूर माहित आहे पण या धगधगत्या मशालीला सांभाळण्याचे काम मात्र साधनाताई यांनी केले होते. या पुस्तकाची सुरुवात होते ही ती, साधनाताई यांच्या बालपणीच्या आठवणीतून. त्यामध्ये त्या, त्यांच्या घरातील सनातनी, जुन्या रूढी-परंपरा आणि त्याचा त्यांच्या मनावर त्यावेळी होत असणाऱ्या संस्कारांचा उल्लेख करतात. तरीही दुसऱ्यावर अन्याय झाल्यावर कळवळणारे मन, बाबा आमटेंच्या सहवासात असतानाही बऱ्याच प्रसंगातून दिसून येते. बाबा आमटेंच्या आयुष्यात, सहचारीणी म्हणून जात असतानाचे प्रसंग खूपच आश्चर्यकारक असेच आहेत. लग्न न करण्याचा घेतलेला निर्णय ' इंदू घुले ' म्हणजेच 'साधनाताई आमटे ...
This site contains information about review of famous marathi books, autobiography, biography, novels, short stories, drama etc.