Skip to main content

Posts

Showing posts from February, 2024

'विखुरलेल्या दोन वाटा '

                     " विखुरलेल्या दोन वाटा" "विखुरलेल्या दोन वाटा बघत होत्या वाट माझी, खूप वेळेपासून चालू शकत नव्हतो मी, दोन्हींवर एकावेळी वाट पाहत असलेला प्रवासी मी, खूप वेळेपासून निवडण्यापूर्वी वाट विचार केला, गर्भितापासून एका वाटेवर चालायचं ठरवलं, मी मनापासून"               "दुसरी वाट, माझ्या वाटेपेक्षा खूप सुंदर होती               त्यावरून चालतानाचा अनुभव सुखदायक होता               पण सर्वांनी निवडलेल्या त्या वाटेवरील                सुखावह सारखेपणा मला नको होता" "दोन्ही वाटेमध्ये जास्त फरक वाटत नव्हता दोन्ही वाटेवर सूर्य ही एकाच वेळी डोकावत होता पण पहिल्या वाटेवरचा सुखद अनुभव मी नाकारला होता आणि मी निवडलेल्या वाटेवरून चालताना परत येण्याबद्दल ,शंकेने  मनात तांडव मांडला होता"                  "खूप वर्षे झाली,या वाटेवरून चालताना   ...

'शरद तांदळे' लिखित पुस्तक ' रावण - राजा राक्षचांचा '

                  'शरद तांदळे' हे नाव परिचित नाही,असे म्हणणारे लोक क्वचितच आढळतात. कोणतीही व्यक्ती घडण्यासाठी त्या व्यक्तीची परिस्थिती कारणीभूत असते, मग काही लोकांना वाईट परिस्थिती मधून त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला तोंड देण्याची ऊर्जा मिळते,तर काही लोकांना चांगली परिस्थिती असतानाही, 'मला काहीतरी करायचं आहे' या विचारातून आयुष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते.आणि त्याचप्रमाणे एका सामान्य घरातील मुलगा स्वकर्तृत्वावर तरुण पिढीचा आदर्श बनतो, ही गोष्ट अविश्वासनीय वाटते. लेखक, तरुण पिढीचे प्रेरणा स्त्रोत आहेतच पण उत्तम  लेखकही आहेत, हे मला त्यांचे पुस्तक  ' रावण - राजा राक्षसांचा' वाचताना जाणवले. लहानपणापासून रामायणाबद्दल ऐकत असताना आणि पुढे रामायण वाचल्यावरही, राम आणि रावण या पात्रांचा विचार करत असताना, रामाच्या व्यक्तीमत्वाबद्दल असणारा चांगुलपणा अभ्यासताना रावणामध्ये चांगले गुण असतील हा विचार मनामध्ये आला नव्हता. पण या पुस्तकाने मला नवीन विचार मिळाला. शरद तांदळे यांच्या लिखाणात वाचकांना पकडून ठेवण्याची जबरदस्त शैली आहे कारण मी हे पुस...