"विखुरलेल्या दोन वाटा"
"विखुरलेल्या दोन वाटा
बघत होत्या वाट माझी, खूप वेळेपासून
चालू शकत नव्हतो मी, दोन्हींवर एकावेळी
वाट पाहत असलेला प्रवासी मी, खूप वेळेपासून
निवडण्यापूर्वी वाट विचार केला, गर्भितापासून
एका वाटेवर चालायचं ठरवलं, मी मनापासून"
"दुसरी वाट, माझ्या वाटेपेक्षा खूप सुंदर होती
त्यावरून चालतानाचा अनुभव सुखदायक होता
पण सर्वांनी निवडलेल्या त्या वाटेवरील
सुखावह सारखेपणा मला नको होता"
"दोन्ही वाटेमध्ये जास्त फरक वाटत नव्हता
दोन्ही वाटेवर सूर्य ही एकाच वेळी डोकावत होता
पण पहिल्या वाटेवरचा सुखद अनुभव मी नाकारला होता
आणि मी निवडलेल्या वाटेवरून चालताना
परत येण्याबद्दल ,शंकेने मनात तांडव मांडला होता"
"खूप वर्षे झाली,या वाटेवरून चालताना
अनेक पिढ्या आल्या, नी गेल्या या वाटेवरून चालताना
विखुरलेल्या त्या दोन वाटा मधून
मी अशी वाट निवडली होती,
ज्यावर पाऊल टाकण्याचे धाडस खूपच कमी जणांनी केले होते
पण याच वेगळ्या वाटेने, वेगळ्या विचाराने
मला त्यांच्यापेक्षा कुणीतरी वेगळंच बनवलले होते."
****************************
(Translation of the poem : The Road Not Taken by Robert Frost)
प्रियांका मदने - मंडले
Comments
Post a Comment