' फिरुनी नवी जन्मले मी'.... अरुणिमा सिन्हा '( अनुवाद - प्रभाकर ( बापू) करंदीकर 'अरुणिमा सिन्हा ' हे नाव सर्वांनाच परिचित आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या वीरबालेचे आत्मचरित्र वाचणे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या संकटांना न घाबरता पुढे जाण्याची प्रेरणा आहे. 'फिरूनी नवी जन्मले मी ' म्हणजेच 'Born again On the Mountain ' या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद 'प्रभाकर करंदीकर ' यांनी अत्यंत सुंदरपणे केलेला आहे. प्रत्येकाचे आयुष्य हे वेगळे असते आणि त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातील संकटे तेवढीच वेगळी आणि आव्हानात्मक असतात. प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी मिळणारी स्फूर्ती म्हणजे हे पुस्तक. या पुस्तकाची सुरुवात एका हृदयद्रावक प्रसंगातून होते. त्यामध्ये दोन ट्रॅक आणि त्यांच्या मधोमध पडलेली अरुणिमा. ती घटना अशी होती की, अरुणिमाला नोकरीची अत्यंत गरज होती आणि सी.आय.एस.एफ. कडून तिला मुलाखतीसाठी बोलावले होते पण त्या पत्रात जन्मतार...
This site contains information about review of famous marathi books, autobiography, biography, novels, short stories, drama etc.