Skip to main content

Posts

Showing posts from January, 2025

ओळख एका पुस्तकाची..." मालगुडी डेज"- "आर. के. नारायण "....मराठीत अनुवाद - मधुकर धर्मापुरीकर

 "मालगुडी डेज"- आर. के.नारायण                   मराठीत अनुवाद - मधुकर धर्मापुरीकर          "मालगुडी डेज " हे "आर. के. नारायण " यांचे पुस्तक म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण अनेक लोकांना बघत असतो, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव  वेगळा असतो, या सर्वांचे चित्रण आहे.  या पुस्तकात लेखकांनी "मालगुडी " या काल्पनिक गावामध्ये, त्यांना भेटलेल्या आणि त्यांना भावलेल्या व्यक्ती यांचे  अत्यंत सुंदर पद्धतीने वर्णन केलेले आहे. त्यांची लेखन करण्याची शैली अतिशय उत्कृष्ट आहे, कारण प्रत्येक कथा वाचत असताना आपल्याला त्यातून बोधक मिळतोच परंतु; ती व्यक्ती त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने रंगवलेली आहे आणि त्यामुळेच ते पात्र आहे तसे आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. त्यामुळे या पुस्तकातील गाव जरी काल्पनिक असले तरीही त्यातील व्यक्तिमत्वे आपल्याला अनेक ठिकाणी भेटत असतात. या पुस्तकामध्ये एकूण 32 कथा आहेत आणि प्रत्येक कथा खूपच सुंदर आहे. या पुस्तकातील प्रत्येकाचा थोडक्यात सारांश पुढील प्रमाणे आहे :    ...

ओळख एका पुस्तकाची:"सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत : सावित्रीबाई फुले "- लेखक:अशोकराव शिंदे सरकार

          हे पुस्तक वाचत असताना सावित्रीबाई फुले यांना लेखकांनी वाचकांसमोर ठेवण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक एका बैठकीमध्ये संपण्यासारखे आहे परंतु; यामधून महत्त्वाच्या खूप साऱ्या गोष्टी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दलच्या समजतात.         या पुस्तकाची सुरुवात होते ती सावित्रीबाई फुले यांचा जन्म होण्याच्या अगोदर पासून. यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या गावामध्ये मोठ्या हौसेने बारसे केले, याबद्दल समजते. ज्या काळात मुलींना जन्माला घालणं म्हणजे शाप समजला जात होता, त्या काळात त्यांच्या वडिलांनी सावित्रीबाई फुले यांचा जन्म मोठ्या आनंदात साजरे करणे ही गोष्ट खूप मोठी होती. आणि ती समाजाला परवडण्यासारखी पण नव्हती. पुढे त्यांच्या मनामध्ये समाजात बदल करण्याची ज्योत तयार झाली,त्या पाठीमागे नक्कीच त्यांच्या वडिलांचा विचार, संस्कार कारणीभूत होते असेच म्हणावे लागेल. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचा संसार फुलू लागला. परंतु; त्यांच्या मनामध्ये शिक्षणा...