" सुधा मूर्ती " लिखित कादंबरी " अस्तित्व " मराठीत अनुवाद प्रा. ए.आर.यार्दी ...पुस्तकाचा सारांश Short Summary
पुस्तकाचे मुखपृष्ठ लेखिका: सुधा मूर्ती ज्यावेळी आपण अस्तित्व या शब्दाचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी प्रत्येक व्यक्ती आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा खटाटोप करताना दिसते. एखाद्या ठिकाणी जर का आपल्या असण्याने किंवा नसल्याने काहीच फरक पडत नसेल, तर मात्र अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि " सुधा मूर्ती " लिखित " अस्तित्व " ही कादंबरी, या कादंबरीचा नायक मुकेश, याच्या जन्मापासून पुढील आयुष्याला वाचकांसमोर मांडण्याचा आणि त्याबरोबर मानवी स्वभावाच्या अनेक छटा समजावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. ही कादंबरी मूळ कन्नड भाषेत " तुमुला " या नावाने प्रसिद्ध झालेली आहे. तसेच या कथानकावर आधारित एक मालिका ...