"प्रशांत दळवी " लिखित "चारचौघी " या नाटकाचे मुखपृष्ठ प्रशांत दळवी हे प्रसिद्ध नाटककार आहेत आणि त्यांचे " चारचौघी " हे नाटक देखील तेवढ्याच परिणामकारक पद्धतीने वाचकांच्या मनात वास्तवाची झालर असणारी धक्कादायक कथा मांडण्याचा प्रयत्न करते."चारचौघी " हे नाटकाचे असणारे वेगळे नावच हे नाटक वाचण्यास प्रवृत्त करते. या नाटकाचा विषय नक्की काय असेल या कुतूहूलापोटीच हे नाटक वाचण्याचे मी ठरवले.बऱ्याचदा नाटकांच्या असणाऱ्या नावावरूनच मी पुस्तक निवडत असते, याबाबतीतही तसेच घडले.आणि पुस्तकाच्या सुरुवातीपासूनच अगदी शेवटपर्यंत पुढे काय होईल? ही उत्सुकता कायम राहिली.हे नाटक म्हणजे समाजमनाला पारंपारिक विचारसरतून बाहेर काढून समाजभान निर्माण करणारे वाटते.हे नाटक जरी तीन अंकांमध्ये विभागलेले असले तरीही, यातून मिळणारा संदेश अनमोल असाच आहे. या नाटकाची सुरुवात एका मध्यम मध्यमवर्गीय...
This site contains information about review of famous marathi books, autobiography, biography, novels, short stories, drama etc.