Skip to main content

" प्रशांत दळवी" लिखित एक गाजलेले नाटक " चारचौघी ": स्त्रियांच्या संघर्षाची कथा (short summary)

           

    

                           "प्रशांत दळवी " लिखित "चारचौघी " या नाटकाचे मुखपृष्ठ 

        प्रशांत दळवी हे प्रसिद्ध नाटककार आहेत आणि त्यांचे "चारचौघी " हे नाटक देखील तेवढ्याच  परिणामकारक पद्धतीने वाचकांच्या मनात वास्तवाची झालर असणारी धक्कादायक कथा मांडण्याचा प्रयत्न करते."चारचौघी " हे नाटकाचे असणारे वेगळे नावच हे नाटक वाचण्यास प्रवृत्त करते. या नाटकाचा विषय नक्की काय असेल या कुतूहूलापोटीच हे नाटक वाचण्याचे मी ठरवले.बऱ्याचदा नाटकांच्या असणाऱ्या नावावरूनच मी पुस्तक निवडत असते, याबाबतीतही तसेच घडले.आणि पुस्तकाच्या सुरुवातीपासूनच अगदी शेवटपर्यंत पुढे काय होईल? ही उत्सुकता कायम राहिली.हे नाटक म्हणजे समाजमनाला पारंपारिक विचारसरतून बाहेर काढून समाजभान निर्माण करणारे वाटते.हे नाटक जरी तीन अंकांमध्ये विभागलेले असले तरीही, यातून मिळणारा संदेश अनमोल असाच आहे. 

         या नाटकाची सुरुवात एका मध्यम मध्यमवर्गीय घरातील दृश्याने होते आणि त्या घरामध्ये असलेल्या वस्तुवरून, या घरामध्ये जास्तीत जास्त स्त्रियांचा वावर असल्याचे जाणवते. आणि सुरुवातीलाच २० वर्षांची मुलगी विनिता आणि ५५ वर्षांची तिची आई यांच्यामधील संवाद कानी पडतो. त्यातून लक्षात येते की विनिताला कॉलेजमधील डिबेट स्पर्धेमध्ये 'स्त्रिया स्त्रियांच्या दास्याला कारणीभूतच आहेत ' या बाजूने बोलायचे असते. पण  विनिताच्या आईला मात्र या विषयाचे कोणते मुद्दे पटलेले नसतात. विनिताने काढलेल्या मुद्द्यांवर आई सांगते की, 'मुळात स्त्री-पुरुष असमानता हाच सगळ्या समस्यांचा पाया आहे. बायको ही फक्त सौंदर्याने चांगली हवी, बाकी विद्वत्तेपासून अगदी वयापर्यंत ती नवर्‍यापेक्षा सगळ्या बाबतीत खुजी असावी ही आपल्या समाजाची अपेक्षा'. हे नाटक जरी बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजेच १९ व्या शतकात लिहिलेले असले तरी, आजच्या काळातही लागू पडते.आजही मोठ्या प्रमाणावर समाजात वावरत असताना लोकांची मानसिकता काहीशी या नाटकात दाखवल्या प्रमाणेच पाहायला मिळते. 

        या दोघींचा संवाद चाललेला असताना विनिताचा मित्र प्रकाश त्या ठिकाणी येतो आणि त्या विषयावर प्रकाश कडून लिहून घेणार असल्याचे आईला सांगत विनीत आणि प्रकाश निघून जात असतात. ते बाहेर जात असतानाच विनिताची मोठी बहीण विद्याताई येताना दिसते. ती खूप थकलेली दिसत असते आणि आल्या क्षणी ती आईच्या गळ्यात पडून रडायला लागते. आई विद्याला शांत राहून काय झाले ते  विचारते. विद्या ही खरे तर सोशलॉजी मध्ये फर्स्ट क्लास असते, तिने सोशल मूव्हमेंट मध्ये डॉक्टरेटही मिळवलेली असते.आणि एका कॉलेजमध्ये ती प्रोफेसर म्हणून काम करत असल्याचे या ठिकाणी समजते. परंतु अचानक येऊन ती का रडत आहे, याबद्दल आईलाही काळजी वाटायला लागते. बऱ्याच वेळेनंतर विद्या सांगते की, तिचा नवरा आशिष याला आतापर्यंत ,ती नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आली होती. "आय ऑलवेज ट्राईड माय बेस्ट टू सॅटिसफाय हिम".वर्षभरामध्ये बऱ्याच गोष्टींकडे ती दुर्लक्ष करत आली होती.पण आता गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या.तिचा नवरा ज्या  ठिकाणी काम करत होता, त्या ठिकाणी असणाऱ्या एका रिपोर्टर  मुलीच्या तो नादी लागला होता. घरात आपली दीड वर्षांची मुलगी आहे, याचेही त्याला भान राहिलेले नव्हते. तिला फसवूनच्या फसवून कुटुंबाबद्दल काहीही बोलत असल्याचेही ती आपल्या आईला सांगते. त्याने केलेल्या या चुकीच्या गोष्टीबद्दल  विद्या त्याला जाब विचारते.त्यावेळी तो तिला म्हणतो की, तुझ्या आईने एका विवाहित पुरुषाला नादी लावलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुझ्या आईला विचार की, तिला दुसऱ्यांचा संसार उध्वस्त करताना लाज नाही का वाटली?'हे ऐकल्यानंतर आई विद्याला सांगते की, मी जो निर्णय घेतला त्याच्या परिणामांची भीती आजही वाटत राहते.हे वाक्य वाचल्यावर लक्षात येतं की, चारचौघी सारख आयुष्य जगत असताना, अनेकदा पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे सर्व दुःख भोगून समोरच्याचा विचार करत असल्यास,एक स्त्री नेहमी समोरच्याचा विचार करत राहते. आणि यातून या सगळ्यापेक्षा जर कोणी वेगळा विचार केला तर त्याला समाजात मान्यता मिळत नसल्याचेही या ठिकाणी लक्षात येते. त्यामुळे आईने जो निर्णय घेतलेला होता, तो समाजाच्या दृष्टीने चुकीचा होता आणि यातूनच विद्याला आपल्या आईच्या निर्णयाबद्दलची बोलणी खावं लागतात. यावेळी वास्तवाची झालर दाखवताना,परंपरेच्या विरुद्ध जाऊन एखादी गोष्ट करताना, स्वतः सोबत आपल्या कुटुंबातील मुलीनाही याचे फळ भोगावे लागू शकते असं त्या आईलाही वाटलं नसेल, पण ते घडताना दिसते. विद्या ही आशिषपेक्षा जास्त शिकलेली असतानाही, तिला तिच्या नवऱ्याची प्रत्येक गोष्ट ऐकून घ्यावी लागते. आणि त्यामुळेच तो त्याच्या बाहेरील संबंधाविषयी स्वतः विद्याकडे कबुली देतो आणि ती मुलगी लग्न होऊन गेल्यानंतर विद्याला परत येण्याबद्दल सांगतो.ही गोष्ट नक्कीच आशिषबद्दल , आपल्या मनात तिरस्कार निर्माण करते. पण या ठिकाणी विद्याला तिच्या दीड वर्षाच्या मिनूची आठवण येत असते, तरी ती परत जायला नकार देते. तिच्या नवऱ्याची चूक झालेली आहे ,त्याबद्दल त्याला माफ कर ,असे घरातील सगळेजण तिला सांगत असतात. पण ती त्यावेळी जे वाक्य बोलते ती वाक्य समाजातील वास्तवाला चपराक देऊन जाते.ती अशीच आशिष सोबत फोनवर बोलत असताना म्हणते, "आशिष ,आपल्यावर मनापासून प्रेम करणाऱ्यांना सोडून तुम्ही का दुसऱ्याच्या मागे लागतात? व्हाय यु नीड ऑलवेज चेंज, जेवणाची चव बदलावी तशी? तुम्हाला शरीराचीही चव बदलावीशी वाटते. अरे मी परत येऊन पुन्हा नवीन मुलगी भेटू नये याबद्दल देवाकडे प्रार्थना करत बसू." या सगळ्याचा विचार करून ती घटस्फोट घेण्याचा निर्णय घेते. पाच वर्षाची मुलगी आईकडे राहील असा नियम असतो. परंतु मुलीला आई आणि वडिलांचे दोघांचे प्रेम मिळायला हवे,यासाठी कोर्टामध्ये केस दाखल करते. त्यामध्ये तिचे म्हणणे असे असते की मुलगी पाच वर्षांची होईपर्यंत सहा सहा महिने दोघांकडेही राहील परंतु; पुरुषप्रधान संस्कृतीचा आपल्या समाजावर पगडा असल्यामुळे कोर्ट तो निर्णय मान्य करीत नाही. परंतु आपण घेतलेल्या निर्णयाचे तिला कौतुक असते. आणि ती आपली मुलगी मिनू तिच्याकडे परत येण्यासाठी वाट बघत राहते. पण या  सगळ्यांमध्ये ती इतर चारचौघांसारखी नवऱ्यापाशी परत जाण्यापेक्षा घटस्फोट घेण्याचा कठोर निर्णय घेते आणि हा निर्णय खऱ्या अर्थाने तिच्या धाडसीपणाची ,जबाबदारीची साक्ष देऊन जातो. 

         त्यानंतर वैजू आणि तिचा नवरा श्रीकांत या दोघांविषयी या ठिकाणी समजते. वैजू आपल्या नवऱ्यासोबत आपल्या आईच्या घरी आलेली असते. ते आपल्या आईला आपल्या नवऱ्याचा नाकर्तेपणा आणि तो सतत कसा नोकरी बदलत असतो त्याबद्दल सांगते . पुढे तिला दिवस जातात, त्यावेळी ती जेव्हा केव्हा बाहेर जाईल, त्यावेळी तिने अबोर्शन तर केले नसेल ना! या विचाराने घाबरणारा श्रीकांत, तसेच होणाऱ्या मुलाची जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थ असणारा श्रीकांत पाहिल्यावर असेच अनेक पुरुष समाजात पाहायला मिळतात.  पण विद्याताई सारखा घटस्फोटही न घेणारी आणि दुसरा संसार न थाटणारी, आपल्या लग्नाची जबाबदारी पार पाडण्यासाठी समर्थ असलेली, आपल्या नवऱ्याच्या चुकीची जाणीव त्याला वेळोवेळी करून देणारी वैजुही सहसा खूप कमी वेळेस पाहायला मिळते. यानंतर दुसऱ्या अंकामध्ये विनिताचे प्रकाश आणि वीरेंद्र या दोघांवर प्रेम असल्याचे समजते. ती आपल्या आईला याबद्दल सांगते,  घरातल्यांशी याबद्दल चर्चा करते, त्यामुळे आई याबद्दल पुन्हा-पुन्हा विचार करण्याचा सल्ला देते. ज्यावेळी ती विद्याताईशी बोलत असते त्यावेळी तिचं म्हणणं असं असतं की, "पुरुषांचे वर्चस्व मान्य केलेल्या समाजात पुरुष एक नाही तर चार-चार बायका ठेवू शकतो पण बाईला मात्र हा नैतिक अधिकार नाही." विनिताला एकाच वेळी दोन मित्र आवडणं आणि त्या दोघांबरोबर ही एकत्र रहावसं वाटत यात काही चूक आहे असं अजिबात वाटत नसतं.तिला प्रकाश बरोबरचा बौद्धिक संवाद आणि वीरेंद्रच धडपडी स्वभाव या दोन्ही गोष्टी आवडत असतात.यावेळी याची तुलना हयवदन या नाटकाशी संवादामधून करण्यात आलेली दिसते. पण ज्यावेळी ती त्या दोघांना एकत्र बोलून आपला निर्णय सांगते आणि तिला दोघांजवळ रहायचे आहे, असा विचार मांडते. त्यावेळी प्रकाशला अशा पद्धतीने राहणं अनैतिक वाटतं. समाजात तर आपल्या बायकोला, आपल्या नवऱ्याला फसवून गुपचूप अशा पद्धतीने राहणारे अनेक जण असतात, त्यामुळे समाजाचा विचार न करता आपण एकत्र राहिलो तर काय अडचण आहे?असे ते विचारते. परंतु त्यांच्याकडून होकार येत नाही आणि दोघांविषयी मनामध्ये प्रेम असताना एकाला पासून दुसऱ्या बरोबर संसार करण्याचे ती मान्य करत नाही.                                              अशाप्रकारे या नाटकात असलेल्या चार स्त्रिया आपले निर्णय समाजाचा विचार न करता घेताना दिसतात. ते निर्णय चुकीचे नाहीत तर, काळाच्या फार पुढचे असल्याचे जाणवतात.त्याचप्रमाणे निर्णय घेतल्यानंतरही त्यांची जबाबदारी तितक्याच खंबीरपणे त्या चौघी सांभाळताना दिसतात. त्यामुळे विनिता, मी कुणाही एका सोबत संसार करू शकत नाही असा निर्णय घेते आणि त्यावेळी आपल्या आईला माझा निर्णय चुकीचा आहे का असे विचारते,त्यावेळी आई जे सांगते ते खूपच मार्मिक असे आहे. तिची आई आई सांगते की, "स्वतःची केलेली उलट तपासणी जितकी परखड नं विनी, तितक्या कठोरपणे तुला कोणीही जाब विचारणार नाही. पण एकदा निर्णय घेतला की पुन्हा डगमगायचं नाही." खरंच अशा पद्धतीने बरीचशी वाक्य आहेत, जी खऱ्या अर्थाने हे नाटक वाचत असताना वेगळा विचार देऊन जातात. त्यामुळे प्रत्येक वाचक प्रेमींनी हे नाटक एकदा तरी वाचायला हवं.

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...