Skip to main content

Posts

Showing posts from February, 2026

जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर माणूस काहीही करू शकतो.. "डॉ. द.व्यं. . जहागिरदार " लिखित "स्टीफन हॉकिंग " यांचे चरित्र.. थोडक्यात सारांश

                   "डॉ.द.व्यं.जहागिरदार " लिखित "स्टीफन हॉकिंग " या पुस्तकाचे मुखपृष्ठ                                          पृष्ठसंख्या: ९५    अनेक व्यक्ती समाजात आपण पाहतो, ज्या समाजात वावरताना स्वतःची तुलना इतरांशी करतात. आपल्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीकडे काय जास्त आहे,याचा विचार करून बऱ्याचदा दुःखी  होतात. आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टीची किंमत कळण्यासाठी विचारात खूप परिपक्वता असावी लागते, हे झाले शरीराने आणि बुद्धीने धडधाकट असणाऱ्या व्यक्तींसाठी. पण ज्यावेळी जन्मतः किंवा कोणत्यातरी आजाराने एखाद्याला अपंगत्व आले तर मात्र त्या गोष्टीची,त्याच्या दुःखाची कल्पना देखील आपण करू शकत नाही. पण अशा संकटातून पुढे जाऊन आपल्या  इच्छाशक्तीच्या आणि जिद्दीच्या जोरावर समाजापुढे एक आदर्श उदाहरण तयार करणाऱ्या महान व्यक्ती देखील आहेत,त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्यातील क्षमतेपेक्षा जास्त यश आपण संपादन करू शकतो. भौतिकशास्त्रात आपल्या...

चार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्यातील या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? हेच जाणून घ्यायचं असेल तर "ल. म. कडू " लिखित चरित्र "चार्ली चॅप्लिन " नक्की वाचायला हवे

                                                     पुस्तकाचे मुखपृष्ठ                                                  लेखक: ल. म. कडू                                                 एकूण पृष्ठसंख्या : १००      प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख संघर्ष आव्हाने असतात पण त्या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर पडून बोलता येणाऱ्या, बोलू न शकणाऱ्या, ऐकणाऱ्या ,ऐकू न शकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हसवणारा अवलिया म्हणजे चार्ली चॅप्लिन. एक विनोद वीर स्वतःच्या संपूर्ण आयुष्यात असणारे दुःख विसरून फक्त हसवण्यासाठी आयुष्यभर झटत राहतो. त्यांच्या अनेक चित्रपटांनी, दुःखात असणाऱ्या अनेक जीवांना हसवण्याचा प्रयत्न केला आणि त्या...

अंगावर फुटलेला कोड आणि त्यामुळे हरवते का माणुसकी?"सुधा मूर्ती " लिखित सुप्रसिद्ध कादंबरी "महाश्वेता " मराठीत अनुवाद "उमा कुलकर्णी " ....थोडक्यात सारांश

                                      "सुधा मूर्ती " लिखित कादंबरी "महाश्वेताचे"मुखपृष्ठ       एखाद्या व्यक्तीला आपण चांगली किंवा वाईट असे लेबल देतो त्यावेळी बऱ्याचदा त्यांच्या असण्यापेक्षा, त्यांच्या दिसण्यावर जास्त भर देतो. एखादी व्यक्ती दिसायला चांगले असेल पण तिच्यावर चांगले संस्कार झालेले नसतील, वर्तन चांगलं असेल तरी देखील फक्त चांगल्या दिसल्यामुळे जर त्यांना समाजात मान सन्मान दिला जात असेल, तर या गोष्टीवर विचार करणे गरजेचे बनते. त्याचप्रमाणे कोणतेही आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना देखील कधी कधी भेदभावाची वागणूक दिली जाते. त्यावेळी त्यांच्या मनावर काही परिणाम होत असेल, याचा विचार आपण सहसा करत नाही. पण ज्यावेळी महाश्वेता ही कादंबरी वाचनात आली, त्यावेळी त्यांचे भविष्य खऱ्या अर्थाने डोळ्यासमोर तरळून गेले. "महाश्वेता " या कादंबरीच्या मूळ लेखिका "सुधा मूर्ती " या आहेत आणि या कादंबरीचा मराठीत अनुवाद  "उमा कुलकर्णी " यांनी केलेला आहे.       या कादंब...