हे आत्मचरित्र इतर पुस्तकांपेक्षा वेगळे आहे. लेखिकेने हे पुस्तक दैनंदिनी किंवा रोजनिशीचच्या स्वरूपात मांडलय आणि हेच वेगळेपण वाचकाचे मन हे पुस्तक वाचण्यासाठी आकृष्ट करते. हे फक्त आत्मचरित्रच नाही तर मानवी जीवनाची शोकांतिका आणि मृत्युतील वास्तविकता याच वाचकांना दिलेलं दर्शन आहे. लग्न झाल्यावर एखादी स्त्री तिच्या भावी आयुष्याची कितीतरी स्वप्न रंगविते. पण लग्नामध्ये सात जन्म साथ देण्याचे वचन देणारा साथ सोडून गेला तर त्याचे दुःख वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.हीच गोष्ट या पुस्तकात सांगितली आहे.
यात लग्ना आधीची ' गीता ' आणि लग्नानंतरची ' शांभवी ' हिच्या आयुष्यातील वास्तवता दाखविली आहे. १९७३ मध्ये किंवा त्याच्या जवळपास शांभवीला जयकर लग्नाची मागणी घालतो.कारण ' नयना ' या मुलीवर प्रेम केल्यावर तिच्या वडिलांनी हे प्रेम नाकारलेले असते. या धक्क्यातून सावरण्यासाठी तो शांभवीला लग्नाची मागणी घालतो.ती त्याला आवडते आणि प्रेम लग्नानंतर होईल अशा साध्यासोप्या भाषेत तो तिला समजावतो. त्यानंतर चार महिन्यांचा अवधी घेऊन ती त्याला होकार देते आणि १९७५ मध्ये त्यांचं लग्न होत. लग्नाच्या वेळी जयकरचे अश्रू कदाचित आपण तिला शेवट देऊ शकणार नाही, याची जाणीव झाल्याचे तर नसतील असेच वाटते. जयराम हा मराठीतील एक नावाजलेला नट असतो पण १९८० मध्ये त्यांच्या गाडीची ट्रकशी टक्कर होते. तो बाहेर येतो. पण शांता जोग ही गाडीत राहिलेली असताना ती जयरामला हाक मारते आणि पेट्रोल पडून गाडीला आग लागते. यात शांती जोग जयरामलाही देवाघरी घेऊन जाते. शांती जोगचा नवराही शांभवीचे पाय धरुन रडतो तो यासाठीच. फक्त पाच - सहा वर्षांचा सहवास शांभवीला खूप काही शिकवून गेला हे तिच्या प्रत्येक शब्दातून जाणवते. आणि या दुःखद घटनेनंतर दोनच महिन्यांत आपल्या मुली ' सोनी आणि मोनिसाठी ' बँकेत नोकरी करणाऱ्या या व्यक्तिमत्वाला सलाम करावासा वाटतो. ती पुढे जाऊन मुलींचे लग्न करते , आणि तेही कुणाकडून कशाचीही अपेक्षा न करता. आणि आपल्या नातवंडांमध्येही ती तिच्या प्रेमाला ' जयरामलाही ' शोधत राहते.
खूप वर्षे निघून गेली तरी ती ' जयरामला ' शोधण्याचा प्रयत्न करते. जयराम सारखी hair style असणारा कुणी दिसला तर वास्तव विसरून बघत राहते. संवाद साधण्यासाठी planchet चाही आधार घेते. हे पुस्तक वाचताना, खरचं ज्याने आपलं प्रेम गमावलं त्यालाच त्याची किंमत कळते हे प्रकर्षाने जाणवते.
Comments
Post a Comment