हे पुस्तक माझ्या पहिल्यांदाच वाचनात आले. हे पुस्तक म्हणजे फक्त कथासंग्रह नसून माणसाच्या आयुष्यातील वास्तवता दर्शवते. यातील प्रत्येक कथा मनाला भुरळ घालते.' चंद्रकुमार नलगे ' यांची लिहिण्याची कला ही मनाच्या गाभाऱ्यात जवळीकता साधते.या पुस्तकातील कथा पुढीलप्रमाणे आहेत.
१) फणसाखालच घर - ही कथा आहे एका कुटुंबाची.ज्यामध्ये काळू मामा आणि सरसाबाई यांचा एकुलता एक मुलगा ' बाबुन्या ' घर सोडून कामासाठी मुंबईला जातो.आणि मुंबई टोळीत एके दिवशी मारला जातो. हे समजल्यावर एका घराची स्वप्न कशी उद्वस्थ होतात, हे वाचताना काळजाला चटका बसतो.
२) चाळ - घरची गरिबी आणि नशिबानं आलेलं अनाथ पण अक्षरशः चाळही पायात बांधायला लावते आणि छबुचे अपंगत्व जीव देण्यास प्रवृत्त करते. अशी ही छ लू , छ बु आणि त्यांच्या भावाची कथा.
३) मस्तक - ही कथा आहे, एका नाकासमोर चालणाऱ्या व्यक्तीची. ज्याला काटेकोर समाजाला भेदता येत नाही. पण सहनशीलतेची किंमत मुलीचा मृत्यू असतो. हे लक्षात आल्यावर त्याला स्वतःचाच राग येताना पाहायला मिळतो.
४) आणि चोर आले - ही कथा खूपच विनोदी आहे. यामध्ये एका कॉलनीतील विविध लोक, त्यांचे निराळेपण आणि चोर येतील या भीतीने त्यांनी केलेला बंदोबस्त हे वाचणे खूप मजेशीर आहे. आणि कथेच्या शेवटी पोलिस येतात आणि या खबरदार नगरची अब्रू लुटून नेतात. या कथेतील प्रत्येक प्रसंग खूप गमतीदार आहे.
५) सरहद्द - अनाहूतपणे दोन गावांच्या सरहद्दीवर भेटलेले दोन जीव वैजू आणि श्रीरंग. लग्न होऊनही श्रीरंग याच्या मृत्यूमुळे ते एक होऊ शकत नाहीत. पण सरहद्द आणि ते आंब्याचे झाड त्याठिकाणी असते.
६) स्वप्नसती - ' असमा ' या आईचे मुलीप्रती असणारे प्रेम आणि नशिबाच्या दुःखद फेऱ्यातून न सुटणाऱ्या या मायलेकी यांची ही कथा. आणि ' सलमच्या ' घरातून गायब होण्यापासून तिच्या आईची यातना या कथेत पाहायला मिळते.
७) चकवा - या कथेत ' बबेराव ' कुत्रं चावत. आणि त्या कुत्र्याला पकडण्यासाठी त्याचा चाललेला अटपी टा आणि हे कुत्र चावलेल असत ते मरत आणि तेव्हा त्याची झालेली अवस्था लक्षात राहण्यासारखी आहे.
८) कुकडी - ही कथा एका वृध्द महिलेची आहे.जी शेण गोळा करण्याचं काम करत असते. त्यातच भुकेपोटी एका घरात येऊन ' आमच्याही लेकान अस आणलाय ' अस म्हणणारी आणि प्रत्यक्षात एकटी राहणारी ही जिगरबाज म्हातारी. शेवटी भूकबळी ठरते आणि मनाला चटका लावुन जाते.
९) धण्णू - ही कथा आहे एका सामन्याची. ज्याच्या मुलानं आत्महत्या केल्यावर वेडा झालेला हा ' धंनु ' प्रत्यक्षात ज्या वाड्यातील पाळण्यामुळे तो जिवंत राहिला, त्या वाड्याला तो शेवटपर्यंत विसरत नाही. नतमस्तक व्हावे असच हे व्यक्तिमत्त्व.
१०) पाळत - ही कथा आहे, धर्मा आणि त्याची बायको गुंठीची. ज्यात ऊस तोडताना लहानपणी पाहिलेली एक घटना आणि त्याच्यातूनच आपल्या बायकोला बाहेर जाऊ न देण्याचा त्याचा निश्चय आणि शेवटी एका अपघातात त्याचा झालेला मृत्यू , हा सगळा मिलाफ या कथेत पाहायला मिळतो.
११) लंका - यामध्ये एका माकडाने एका वसाहतीत चालवलेला चोरीचा मामला दर्शविला आहे.
१२) झुला - या कथेत दुष्काळामुळे बैल विकण्याची वेळ लोकांवर आली. आणि बैलांच्या त्या झुल्या कडे पाहण्याची कुठली आशाच राहिली नाही.या आशयाची कथा याठिकाणी मांडली आहे.
१३) गिन्यान - दोन गाव वाल्यांचा अनुभव पर संवाद खूप काही ज्ञान सहजच देऊन जातो, त्याची ही कथा.
१४) काळाची पावलं - या कथेत सयाजीराव ने कारखान्यावर केलेला कब्जा आणि त्यातूनच चांगल्याच होत चाललेलं अधःपतन या कथेत दाखविले आहे.
१५) गावगुंडी -आवबादाजीचे निवडणुकीत हारणे आणि विसुचे जिंकणे दाखविताना शेवटी गावावर वीज कोसळल्याचे चित्र उभा करत मर्मिकाता दाखविली आहे.
अशा प्रकारे या पुस्तकातील प्रत्येक कथा काही ना काहीतरी नवीन शिकवून जाते.
Comments
Post a Comment