अनिल बर्वे लिखित नाटक "आकाश पेलताना " खऱ्या अर्थाने हे नाटक म्हणजे समाजकारण आपण कशाला म्हणतो आणि त्या पाठीमागे असणारे सत्य किती विदारक असू शकते, त्याचप्रमाणे यामधील राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन या दोन्हीमध्ये मध्य साधत असताना जाणवणारे वास्तव मनाला सुन्न करून जाते. हे नाटक जरी काल्पनिक पात्रांना घेऊन लिहिले असले तरी त्यामध्ये राजकारण कशा पद्धतीने असू शकते यावरही हे नाटक भाष्य करते.राजकारणाकडे बघत असताना सत्ताकारण आणि समाजकारण कसे बदलते हे देखील या नाटकाच्या माध्यमातून लक्षात येते.
हे पुस्तक म्हणजे राजकारण आणि समाजकारण यामधील वास्तव परिस्थिती यावर विचार करायला भाग पाडते. या नाटकाची सुरुवात एका दृश्याने होते, ज्यात दोघेजण दारू पीत बसले आहेत आणि त्यांच्यात राजकारण आणि एका विशिष्ट पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेले खून याबद्दल चर्चा चालली आहे. प्रत्येक गोष्ट घडण्यापाठीमागे एक व्यवस्था काम करत असते आणि तीच जर का भ्रष्ट असतील तर त्याठिकाणी चांगल्याची अपेक्षा आपण करू शकत नाही. या नाटकामधील सुरुवातीच्या दृश्यामध्ये दाजीसाहेब एक पक्के राजकारणी आणि त्यांच्यासोबत असणारे प्रिन्सिपल जाधवराव दारू पीत बसलेले दिसतात. त्याचप्रमाणे दाजीसाहेब राजकारणात सक्रिय आहेत ,पण सत्ता भोगण्याची हाव असलेली व्यक्ती पण सत्तेच्या हव्यासापोटी कोणकोणत्या गोष्टी करते आणि त्याचा शेवट अतिशय वाईट कसा होतो हे देखील या ठिकाणी पाहायला मिळते. या दोघांमध्ये झालेला संवाद असा होता की "दारूबंदी आणि दारूचे दुष्परिणाम " या विषयावर दाजीसाहेबांना भाषण करायचे आहे आणि त्याची लेखी स्क्रिप्ट तयार करून देण्यासाठी ते जाधवरावांना विनंती करत आहेत. म्हणजे यामधूनच समजते की, असणारे समाजकारण आणि दुसऱ्या बाजूला बघितले जाणारे राजकारण यामध्ये किती फरक असतो.ते दोघे चर्चा करत असताना गर्जन वर्तमानपत्राच्या संपादकाचा खून अशी बातमी पेपर मध्ये आल्याचे लक्षात येते. आणि त्याचीही चर्चा ते त्याचबरोबर करू लागतात. पण त्याच्या मध्ये असं जाणवतं की, गर्जनच्या संपादकाचा खून दाजीसाहेबांनीच दोन मारेकऱ्यांना म्हणजेच मारत्या आणि गेण्या या दोघांना खूण करण्यासाठी पाठवलेले होते. खून एकाचा करायला सांगितले होते पण ते दोघे खऱ्या अर्थाने त्या संपादकाच्या बायकोचा आणि मुलीचा सुद्धा खून करून परत येतात. या गोष्टीचा धक्का त्यांना बसतो, असं सुरुवातीला एका खुनाची चर्चा करत असताना ते दोघे दिसतात. या नाटकामध्ये असणारी बरीचश्या वाक्ये राजकारण समाजकारणापेक्षा किती महत्त्वाचे आहे आणि ते करत असताना कुठल्याही गोष्टीचा चांगला वाईट विचार कशाला करायचा अशी मानसिकता दाजीसाहेब या पात्राच्या माध्यमातून लेखकांनी वाचकांच्या पुढे अतिशय सुंदर पद्धतीने ठेवलेले आहे.
या खुनाची चौकशी ज्यावेळी पोलीस स्टेशन मध्ये होते, त्यावेळी त्या संपादकाच्या घरी काम करणारा नोकर भीक्या याच्यावर खुनाचा संशय ठेवण्यात येतो. त्याची बायको सावित्री, 'माझ्या नवऱ्याने खून केलेला नाही, त्यामुळे माझ्या नवऱ्याला शिक्षा मी म्हणून होऊ देणार नाही' असे ठरवते. आता या यासाठी बाप्पाची, या नाटकातील अजून एक पात्र यांना ती 'तुम्ही माझ्या नवऱ्याची वकील म्हणून बाजू मांडा आणि त्यांना निर्दोष सुटण्यासाठी मदत करा ' अशी विनंती करते. खरंतर बाप्पाजी सुद्धा दाजीसाहेबांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले असतात. परंतु; एके दिवशी त्यांचा असणारा मित्र, मास्तर काही देणगी मागण्यासाठी त्यांच्याकडे येतो त्यावेळी बाप्पाजी खूप पैसे देण्याचे कबूल करतो परंतु; तुम्ही मिळवलेला पैसा चांगल्या मार्गाने मिळवलेला नाही, त्यामुळे तुमच्या पैशामधला एकही रुपया, मी करत असलेल्या चांगल्या कामासाठी मला नको आहे, असे सुनावतो. खऱ्या अर्थाने ही गोष्ट बाप्पाजीला विचार करायला भाग पाडते. आपण एवढं मोठं झालो , खरंच आपण प्रामाणिकपणे कोणकोणत्या गोष्टीतून पैसा मिळवला हे पण त्या ठिकाणी बाप्पाजीला वाटायला लागते . तसाच तो विचार करत असताना, मास्तर ज्यावेळी सांगतो की, ज्या संपादकाचा खून झालेला आहे, त्याची बायको माझी मुलगी होती आणि त्यातील लहान मुलगी त्यांची नात होती. आणि त्यामुळे खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे असे तो जाता जाता बोलून जातो. त्या वाक्यानंतर मात्र, आज आपण न्यायासाठी लढूयात असा संकल्प घेऊन बाप्पाजी कोर्टामध्ये दाजी विरुद्ध केस लढायला तयार होतो. खऱ्या अर्थाने दाजीसाहेबांची पावर खूप मोठी आहे लक्षात असताना देखील आणि आपल्यावर असणाऱ्या उपकारांचे सुद्धा ओझे जर आपण एखाद्या गरीब व्यक्तीला न्याय देऊ शकलो नाही तर कोणत्याच गोष्टी अर्थ राहणार नाही याची जाणीव बाप्पाजीला होते आणि ते दाजीसाहेबांविरुद्ध लढायला तयार होतात. दाजीसाहेबांचा असणारा मुलगा आणि बाप्पाजीची असणारी मुलगी बाबी यांचे लग्न ठरलेलं असतं. पण ज्यावेळी बाप्पाची दाजीसाहेबांविरुद्ध उभा राहणार आहे, हे समजते त्यावेळी ते लग्न मोडते. मग गोष्टी अशा घडतात की ज्यातून दाजीसाहेब जिंकणार हे निश्कचित होते पण या सगळ्या मधून आपण चांगल्या गोष्टीसाठी लढतोय याचं समाधान बाप्पाजीला पुरून उरणारे असते. सगळा घटनाक्रम घडत असताना एका रात्री दाजीसाहेबांचा मुलगा आत्महत्या करतो आणि ज्याच्यासाठी आपण सगळं करत होतो तोच आपल्यात राहिला नाही ह्या दुःखामध्ये दाजीसाहेब रडत बसलेले दिसतात. आणि त्याचवेळी त्यांच्या पक्षात असणारी माणसे फुटतात खऱ्या अर्थाने "आकाश पेलाताना " येणारी अनेक संकटे शेवटी दाजीसाहेबांनाच घेऊन थांबतात. मुलाचा झालेला मृत्यू आणि पक्षातून फुटलेली माणसं हा धक्का दाजीसाहेबांना अजिबात सहन होताना दिसत नाही.
अशाप्रकारे, हे नाटक म्हणजे खऱ्या अर्थाने विचार करायला भाग पाडते. खरंच जर अशी सत्तेची हाव केली, राजकारणामध्ये जास्त आपण सक्रिय झालो, तर बऱ्याचदा बऱ्याचशा गोष्टी आपण विवेकबुद्धीने विचार करायचा सोडून देतो. आपला स्वार्थ, आपली सत्ता असली पाहिजे ,आपल्याच गोष्टी पुढे गेल्या पाहिजेत किंवा आपल्यालाच लोकांनी ओळखलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपल्यापाशीच असलि पाहिजे अशी बरेचश्या गोष्टीतून मानसिकता होताना दिसते. पण हे करत असताना आपण कधी आपल्याला विचारत नाही की, आपण ज्या मार्गाने जातोय तो मार्ग खरंच चांगला आहे का किंवा आपण कुठे वाईट तर करत नाही ना. आपण बघतो स्वतःचा विचार करताना , सत्तेचा विचार करताना आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी दुसऱ्याच वाईट झालं किंवा दुसऱ्याचा झालेला खून जसे दाजीसाहेबांना काहीच फरक पडत नाही. ज्यावेळी राजकारणाचा बऱ्याचदा आपण विचार करतो, तर सामान्य माणसाला होणाऱ्या हालापेष्टा सामान्य माणसाला होणारे दुःख जरी समोर ते दाखवत असले तरी, खरंच त्यांच्या मनात त्या गोष्टी आहेत का हे पण आपल्याला कधी कधी समजत नाही. मग ज्यावेळी सत्ताकारणाचा ,राजकारणाचा खरा चेहरा समोर येतो तेव्हा मात्र आपल्याला कळून चुकते की, खरंच आपण त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवत होतो आणि एवढं जे आपल्याला वाटत होतं की आपल्यासाठी काहीतरी चांगलं करतील पण खऱ्या अर्थाने गोष्टी आहेत त्या वेगळ्याच आहेत. यामध्ये सुद्धा दाजीसाहेबांना त्या खुनातून ते सुटले किंवा त्यांच्या बाजूने जास्त पुरावे नाही भेटू शकले परंतु; जो खरा न्याय होता तो गर्जनच्या संपादकाला मिळालाच.कारण शेवटी आपला मुलगा गमावल्याचे दुःख आणि पक्ष फुटला याचे आणखी दुःख ज्यावेळ त्यांच्या वाट्याला येते तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने लक्षात आलं असेल की, जेव्हा आपण एखाद कुटुंब उध्वस्त करतो, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी तेव्हा त्यांना कसं दुःख झालं असेल याची जाणीव होते. किंवा त्यांनी खऱ्या अर्थाने गर्जनचा संपादक दाजीसाहेबांच्या सगळी चुकीच्या गोष्टी किंवा त्यांनी केलेले खून उलघडणार होता म्हणून दाजीसाहेबांनी त्यांचा खून करायला ,ज्या मारेकऱ्यांना पाठवलं त्यांनी संपादकाला तर मारलंच ,पण अंधारातून येणाऱ्या छोट्या मुलीला आणि त्याच्या बायकोला ओळखू शकले नाहीत. त्यांना पण ते मारून आले ,त्यांनी त्यांचं काम केलं परंतु दाजीसाहेबांची प्रवृत्ती होती की, माझं चांगलं होण्यासाठी दुसऱ्याचा वाईट झालं तरी माझं काहीच बिघडणार नाही, ही वृत्ती हे नाटक संपताना लेखक सांगताना दिसत आहे. लेखकाने जे काम केले आहे, ते खूपच सुंदर असं आहे. कारण; हि वेगवेगळी पात्र म्हणजे वेगवेगळ्या प्रवृत्ती आहेत, जे आपल्या समाजामध्ये, आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात दिसत असतात. आणि कुठल्याही गोष्टीला जज करत असताना वरवरच्या दिसणाऱ्या गोष्टी खरच तश्या असतील का ते मात्र समजत नाहीत. पण त्यामुळे जज करताना, पण आपण किती विचार केला पाहिजे हे पण या ठिकाणी लक्षात येते. आपल्या आयुष्यामध्ये कधी काय घडेल किंवा आपल्या बाबतीत काहीही होऊ शकतं हे कोणालाच माहित नसते. त्यामुळे शक्य तितका अंदाज न देता, या ठिकाणी समाजात वावरत असताना ज्यावेळी आपण राजकारणाचा विचार करतो ,त्यावेळी सुद्धा समाजकारण बघता त्याच्या मागचं जे वास्तव आहे ते सुद्धा या ठिकाणी जाणून घेतल्याशिवाय विस्वास ठेवता कामा नये असं पण इथे दिसते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट बघत असताना वरवर न बघता त्याच्या आत मध्ये शिरता आलं पाहिजे, तरच या जगामध्ये आपण टिकू शकतो, असंच म्हणावं लागेल. त्यामुळे हे पुस्तक अतिशय सुंदर आहे आणि लेखकाने ज्या पद्धतीने लेखन केलेले त्यामुळे पुस्तक हातात घेतल्यापासून शेवटपर्यंत वाचावंसं वाटतं. त्यामुळे प्रत्येक वाचक प्रेमींनी हे नाटक वाचायला हवं. छोटं असणार हे नाटक खूप काही शिकूवून जाते.
Comments
Post a Comment