Skip to main content

प्रत्येक सामान्य माणसातला बाबुराव समजण्यासाठी "वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)" यांचे "आमचं बाबुराव " हे नाटक एकदा वाचायलाच हवं."Short Summary

 

          
                  वि. वा. शिरवाडकर लिखित नाटक " आमचं बाबूराव" याचे मुख्यपृष्ठ 

              प्रत्येक सामान्य माणसाला ज्यावेळी एका नजरेतून पाहतो, त्यावेळी तो माणूस नेहमीप्रमाणे आपलं आयुष्य जगत असतो. पण त्याचबरोबर स्वप्नात जे आयुष्य जगत असतो,ते नेहमीच्या आयुष्यापेक्षा खूप वेगळच असतं. वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) त्यांचे "आमचं बाबूराव" हे नाटक देखील याच वास्तवतेला वाचकांसमोर अतिशय सुंदरपणे ठेवण्याचा प्रयत्न करते. या नाटकात जरी वास्तव दाखवले असले तरीही त्यातील अनेक वाक्ये गमतीदार संवादाची तर काही संवाद वास्तवतेला जवळून स्पर्श करताना आढळतात. 

          हे नाटक तीन अंकांमध्ये विभागलेले आहे. नाटक जरी लहान असले तरी मनाचा वेध घेत मध्यमवर्गीयांच्या जीवनातील खरेपणाला स्पर्श करते. सुरुवातीला जरी नाटक गुंतागुंतीचे वाटत असले तरी, पुढे-पुढे मध्यमवर्गीय, सामान्य माणसाचा संघर्ष, त्याच्या कुटुंबीयांच्या त्याच्याकडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षा आणि आपल्या कुटुंबाच्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना स्वतःकडे अजिबात लक्ष देत नसल्याचे बाबूराव या पात्राकडे पाहताना या ठिकाणी लक्षात येते. या नाटकातील प्रमुख पात्रे आहेत बाबूराव, अगदी राजासारखा दिसणारा हा बाबूराव, दुसरा पात्र राजा, राजदरबारातील मंत्रिमंडळ, शिपाई आणि बाबूरावचं कुटुंब. या नाटकाची सुरुवात ही अतिशय गमतीदार दाखवलेली आहे. एका सलून मध्ये केस कटिंग, दाढी करणारा बाबूराव न्हावी आपल्या दुकानात बसलेला असतो. दुकानाला सुट्टी असते आणि त्यावेळी त्याच्या दुकानात एक गिऱ्हाईक येते. त्याला बघितल्यावर तो या शहरातील नसावा असा तो अंदाज बांधतो, कारण दुकान बंद आहे हे त्या गिऱ्हाईकाला माहिती नसते. त्या दोघांच्यात त्यावेळी बातचीत चालू होते, त्यावेळी एकमेकांना एकमेकांकडे पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही कारण दोघांच्या चेहऱ्यात बरेच साम्य असते. याच वळी पूर्ण शहरात काही तासापूर्वी महाराज गायब झाल्याची वार्ता पसरलेली असते. याचवेळी पूर्ण शहरात काही तास दरबारातील सर्वजण राज्याची शोधा शोध करत असतात आणि सगळीकडे त्याचाच गोंधळ उडालेला दिसत असतो. बाबुराव सामान्य माणूस पण ती व्यक्ती राजाच असल्याचे काही वेळातच ओळखते. त्यानंतर राजा बाबूराव च्या बुद्धिमत्तेबद्दल खूप कौतुक करतो आणि राजाची दाढी करत असताना ते दोघे राज्यकारभारात घडणाऱ्या अनेक गोष्टी याबद्दल चर्चा करताना दिसतात. 

         एका सामान्य माणसाच्या नजरेतून बाबुराव आपलं मत मांडत असतो. राजापुढे अनेक गोष्टींची काळजी असते. त्या दोघांमध्ये होणाऱ्या संभाषणामधून बऱ्याच गोष्टींचा उकल होताना पाहावयास मिळते. बाबुराव आपल्या कुटुंबासाठी सतत काम करत असतो आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. पण या सगळ्यात त्यालाही आराम करावासा वाटत असतो स्वतःसाठी वेळ द्यावासा वाटत असतो कोणत्याही प्रकारचा विसावा मिळताना दिसत नाही. ज्याप्रमाणे बाबुरावला आपल्या संसाराची काळजी असते त्याप्रमाणे राजापुढेही काही समस्या असतात आणि त्यातून काहीतरी मार्ग निघावा यासाठी देवाची प्रार्थना करत असतो. राजाची दाढी केल्यावर बापू आणि राजा या दोघांना ओळखणे हे अवघड होऊन बसते. बाबुराव चे भाव बायको होतीले आपल्या नवरा ओळखता येत नाही. काही वेळाने राजाच मुलीवर प्रेम असते त्यांनी त्याचा प्रवेश होतो. त्यानंतरच्या काही वेळाने राजदरबारातील शिपाई शोध घेत बाबुरावच्या दुकानापाशी येतात. आणि राजा एका दिवसासाठी घाबरवला राजा बनण्यासाठी सांगतो आणि तो बाबुराव बनतो. सेवक आत येतात त्यांनी बाबुरावला राजा समजून सुद्धा सोबत घेऊन जातात. दादरभरात गेल्यानंतर बाबुराव ची बुद्धिमत्ता पणाला लागते. चिटणीस सेनापती शिपाई महामंत्री सर्वजण त्याच्यापाशी येऊन दरबारातील बऱ्याच गोष्टी त्याला सांगत असतात. त्यामध्ये बाबुराव राजवाडे प्रवेश करतो त्यावेळी राजाचे लग्न करण्यासाठी हेमांगिन त्यांच्या मागे लागलेली असत. तिच्यातून सुटका करणे हेच एक प्रमुख वाहन बबुराव समोर असते म्हणजेच राजासमोर असते. आपल्या बुद्धीने हेमांगीनीला अतिशय परखडपणे आणि हजारजबाबिने नकार देतो आणि त्यातूनच पुढे हेमांगीनी सेनापती सोबत लग्न करते. 

         त्यानंतर अजून एक आव्हान असते, मल्हार प्रांतात लष्करी कायदा मंजूर करण्याबद्दल. महामंत्र्यांना तो कायदा संमत करायचा असतो पण आरोग्यमंत्र्यांचा त्याला विरोध असतो. ही गोष्ट अतिशय परिणामकारकपणे बाबूराव सभेमध्ये  मंजूर करतो. आणि या निर्णयामुळे एका नाव्ह्याच्या दुकानातून आल्यापासून महाराजांमध्ये झालेला बदल सर्वांना अचंबित करत असतो. खऱ्या अर्थाने या सगळ्या परिस्थितीत बाबूराव जरी राजाची भूमिका पार पाडत असला तरी, सामान्य माणसाच्या भूमिकेत अधून- मधून जात असतो आणि अनेक संवादामधून मध्यमवर्गीय माणसांचे आयुष्य सांगत असतो. नाटकात याच  संदर्भात चर्चा चाललेली असताना मध्यमवर्गीय माणूस कधी पुढे जात नाही किंवा त्याला  पुढे जाऊ दिले जात नाही असाच  खुलासा बाबूराव हे पात्र या नाटकामध्ये करताना दिसते. 'मध्यमवर्ग आणि राजसत्ता' हे पुस्तक देखील महामंत्री वाचण्याचा सल्ला बाबूरावला देतात. जनता-जनार्दनाचा विचार राजकारणात, राजकारणाच्या नियमात केला जात नसल्याचे महामंत्री कबूल करतात. बाबूराव जरी राजा बनला तरी असला तरी सामान्य माणसांशिवाय राजकारण पुढे जाऊ शकत नसल्याचे अनेक सामान्य, लहान-लहान उदाहरणातून पटवून देण्याचा प्रयत्न करतो. एका दिवसासाठी राजा बनलेला बाबूराव सामान्य, मध्यमवर्गीय माणसाच प्रतिनिधित्व करतो. सगळं काही जिथल्या तिथं मिळणाऱ्या माणसांना सामान्य माणसांच्या परिस्थितीचा  सहज विसर पडतो आणि छोट्या- छोट्या समस्या ही नजरेआड होताना दिसतात. राजवाड्यात राजा बनल्यानंतर अनेक समस्यांचे निराकरण बाबूराव करतो पण त्याला त्या मुकुटातून सुटका कधी होते याचीच गडबड लागलेली दिसून येते. बाबूराव राजा म्हणून येतो, आपल्या बायकोला रेवतीला  सोबत घेऊन येतो पण राज्याचे राजे पद उपभोगत असताना, मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनाही किती मर्यादा असतात याचे देखील वास्तववादी चित्रण या नाटकाच्या माध्यमातून कुसुमाग्रज या ठिकाणी करताना दिसतात. 

         हे नाटक जोडी वाचकाला हसवते तेवढ्याच प्रमाणात समाजात चालणाऱ्या, राजकारणात चालणाऱ्या,राज्यात चालणाऱ्या ढोंगीपणावर टीका करते. जग हे स्वार्थ आणि स्वतःच्या फायद्यावर आधारलेले असते. पण दुसरीकडे बाबूराव सारख्या व्यक्तिरेखा मनाचा मोठेपणा जपत दुसऱ्याचा विचार करताना पहावयास मिळतात. राजाच्या एका शब्दापोटी कोणत्याही गोष्टीची काळजी न करता राजा बनायला तयार झालेला बाबुराव कधी आपल्याला आपलंसं करून टाकतो समजतच नाही. कोणतीही गोष्ट केली की, आपल्याला त्यापासून काही फायदा होईल का हा विचार सामान्य, मध्यमवर्गीय माणूस करत नाही. पैशापेक्षाही माणुसकी जपण्याचे काम करतात ती देखील सामान्य माणसच असतात, स्वतःपेक्षा समोरच्याचा विचार करत दुसऱ्याचा चांगल व्हावं असा विचार करणारी माणस साधी आणि सामान्य असतात,या नाटकामधील आपल्या बाबूराव सारखी. अनेक अडचणी असतात,चुका दिसत असतात पण त्या विरुद्ध  बोलण्याचे धाडस सामान्य माणस करत नाहीत किंवा नको त्या भानगडीत अडकायला कशाला पाहिजे असा विचार करून मागे सरताना दिसतात, असे नाटक वाचताना लक्षात येते. पण बाबूराव राजा बनल्यानंतर निदान आपल्या बोलण्यातून, घेतलेल्या निर्णयातून सामान्य माणसाचे महत्त्व पटवून देतो. खरंच विनोदी पद्धतीने वास्तव परिस्थितीवर कशाप्रकारे टीका करता येते किंवा भाष्य करता येते हे समजण्यासाठी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचे नाटक प्रत्येक वाचक प्रेमींनी नक्की वाचायला हवे.

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...