बसमधील प्रवास.....ते आजोबा... बस मधील प्रवास आणि प्रवासात अनुभवलेले काही क्षण हे नेहमीच खूप वेगळे असतात. आणि त्याविषयी मी आज लिहिणार आहे. मी सध्या एका कॉलेज मध्ये 'इंग्लिश' हा विषय शिकवते. हे कॉलेज माझ्या गावापासून वीसेक किलोमीटरवर आहे. त्यामुळे मला बसनेच यावे आणि जावे लागते. हा बसचा प्रवास तसा काही माझ्यासाठी नवीन नाही. कारण कॉलेजची दोन वर्षे मी ' सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज' कराड या ठिकाणी होते. बी. ए. चे शिक्षण घेत असताना बसचाच प्रवास असायचा, पण त्यावेळी लग्न झालेले नव्हते आणि त्यामुळे मम्मीने केलेला डबा घ्यायचा, स्वतःचे आटोपायचे आणि बस स्टॉप वर जायचे. पण आता स्वतः च डबा बनवून घेऊन बस पकडावी लागते. आणि ही एक तारेवरचीच कसरत असते.तसे पाहिले तर ,कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी ७:१५ ची बस पकडावी लागते आणि काही कारणामुळे ही बस चुकली , तर मग ८:०० वाजेपर्यंत दुसऱ्या बसची वाट पहावी लागते. थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी असणारी ७:१५ ची बस चुकली तर त्या ठिकाणी थांबणे अवघड होऊन जाते. ...
This site contains information about review of famous marathi books, autobiography, biography, novels, short stories, drama etc.