'प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं' या ओळी बऱ्याच वाचकांनी बऱ्याच वेळा वाचल्या- ऐकल्या असतील. ज्यावेळी एखादी मुलगी किंवा मुलगा तारुण्यात प्रवेश करतो, त्यावेळी त्या वयामुळे एकमेकांना एकमेकांविषयी आकर्षण वाटू लागते. आणि त्याच्याच पुढे जाऊन त्याचे रूपांतर बऱ्याचदा प्रेमात होताना पहावयास मिळते. पण पुढे ज्याला पहिले प्रेम म्हटलं जातं ते टिकतच असं नाही. मग काही दिवसांमध्ये त्या दोघांमध्ये भांडणे होऊ लागतात,वाद होतात आणि ते टोकाला जाऊन पहिल्या प्रेमाचे रूपांतर घटस्फोटात होते. आजूबाजूला निरीक्षण करताना अशी बरीचशी उदाहरणे ऐकायला मिळतात. हे मी एवढ्यासाठी सांगत आहे कारण, वि.स.खांडेकर यांची 'पहिले प्रेम' ही कादंबरी प्रेमाचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडते. मला देखील सुरुवातीला कादंबरीत पहिल्या प्रेमाची उत्कटता आणि त्याचे गोड गायले असतील असे वाटत होते, त्यामुळे ही कादंबरी वाचताना नवीन काहीतरी शिकायला मिळालं असंच वाटलं. कादंबरीची कथा एका व्यक्तीला...
प्रत्येक सामान्य माणसातला बाबुराव समजण्यासाठी "वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)" यांचे "आमचं बाबुराव " हे नाटक एकदा वाचायलाच हवं."Short Summary
वि. वा. शिरवाडकर लिखित नाटक " आमचं बाबूराव" याचे मुख्यपृष्ठ प्रत्येक सामान्य माणसाला ज्यावेळी एका नजरेतून पाहतो, त्यावेळी तो माणूस नेहमीप्रमाणे आपलं आयुष्य जगत असतो. पण त्याचबरोबर स्वप्नात जे आयुष्य जगत असतो,ते नेहमीच्या आयुष्यापेक्षा खूप वेगळच असतं. वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) त्यांचे "आमचं बाबूराव" हे नाटक देखील याच वास्तवतेला वाचकांसमोर अतिशय सुंदरपणे ठेवण्याचा प्रयत्न करते. या नाटकात जरी वास्तव दाखवले असले तरीही त्यातील अनेक वाक्ये गमतीदार संवादाची तर काही संवाद वास्तवतेला जवळून स्पर्श करताना आढळतात. हे नाटक तीन अंकांमध्ये विभागलेले आहे. नाटक जरी लहान असले तरी मनाचा वेध घेत मध्यमवर्गीयांच्या जीवनातील खरेपणाला स्पर्श करते. सुरुवातीला जरी नाटक गुंतागुंतीचे वाटत असले तरी, पुढे-पुढे मध्यमवर्गीय, सामान्य माणसाचा संघर्ष, त्याच्या कुटुंबीयांच्या त्याच्याकडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षा आ...