"पहिल्या प्रेमाला अनन्य साधारण महत्त्व देणाऱ्यांनी 'वि.स. खांडेकर' यांची कादंबरी "पहिलं प्रेम" नक्की वाचायला हवी."
'प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं' या ओळी बऱ्याच वाचकांनी बऱ्याच वेळा वाचल्या- ऐकल्या असतील. ज्यावेळी एखादी मुलगी किंवा मुलगा तारुण्यात प्रवेश करतो, त्यावेळी त्या वयामुळे एकमेकांना एकमेकांविषयी आकर्षण वाटू लागते. आणि त्याच्याच पुढे जाऊन त्याचे रूपांतर बऱ्याचदा प्रेमात होताना पहावयास मिळते. पण पुढे ज्याला पहिले प्रेम म्हटलं जातं ते टिकतच असं नाही. मग काही दिवसांमध्ये त्या दोघांमध्ये भांडणे होऊ लागतात,वाद होतात आणि ते टोकाला जाऊन पहिल्या प्रेमाचे रूपांतर घटस्फोटात होते. आजूबाजूला निरीक्षण करताना अशी बरीचशी उदाहरणे ऐकायला मिळतात. हे मी एवढ्यासाठी सांगत आहे कारण, वि.स.खांडेकर यांची 'पहिले प्रेम' ही कादंबरी प्रेमाचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडते. मला देखील सुरुवातीला कादंबरीत पहिल्या प्रेमाची उत्कटता आणि त्याचे गोड गायले असतील असे वाटत होते, त्यामुळे ही कादंबरी वाचताना नवीन काहीतरी शिकायला मिळालं असंच वाटलं. कादंबरीची कथा एका व्यक्तीला...