' पालावरचे जग ' हे 'लक्ष्मण माने ' यांचे पुस्तक माझ्या वाचनात आले. या जगात आपल्याला असंख्य लोक भेटत असतात. काहीजण आपल्या आठवणीत राहतात, तर काही लोकांना काळाच्या ओघात आपण विसरून जातो. आयुष्याबद्दल आपण कितीतरी सुंदर कल्पना करत असतो. पण ज्या आयुष्याची आपण कल्पना करू शकत नाही, अशा काही लोकांचे अनुभव 'लक्ष्मण माने ' यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा खूप सुंदर प्रयत्न केलेला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीपासूनच त्यामध्ये भटक्या जाती-जमाती मधील लोकांचे अनुभव कथन केलेले आहेत. अशा जमाती ज्यांना स्वतःचे अस्तित्व नसते, ज्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरावे लागते,ज्यांचे आयुष्य जात पंचायतीच्या निर्णयावर अवलंबून असते. पण काळाच्या ओघात या लोकांमध्ये बदल घडत आहेत. हे या पुस्तकाच्या रूपाने दाखविलेले आहे. सुरुवातीला वैदू समाजाचे वर्णन आहे. लंगोटी लावून वाईच औषध, वाताचं औषध, सुई- दोरा विकणारा वैदू, माणसांच्या सावलीला बीचकणारा वैदू, गाढवाच्या पाठीवर बिऱ्हाड घालून कुत्र्यांची खांड्याच्या खां...
This site contains information about review of famous marathi books, autobiography, biography, novels, short stories, drama etc.